Sonali Phogat Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : तपासाला गती; पोलिसांना सापडले धागेदोरे

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात आर्थिक माहितीचा तपशील हाती

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : भाजप नेत्या सोनाली फोगट मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सोनालीच्या मूळ गावी हिस्सारला गेलेल्या पोलिस पथकाने सोनालीच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील मिळवला. हा तपशील या हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकेल, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी दिली आहे.

पोलिस अधीक्षक सक्सेना म्हणाले, हिस्सार येथील धागेदोरे, इतर तपशील साक्ष पुराव्यांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकरणातील आवश्यक असलेली कागदपत्रे, आर्थिक व्यवहाराचे तपशील आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी यापूर्वी या प्रकरणातील मुख्य संशयित सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ही महत्त्वाची माहिती पोलिसांनी मिळवली असून गोवा पोलिसांचे जे पथक हरियाणा येतील फोगट यांच्या मूळ गावी हिस्सारला गेले होते, त्या पथकानेही सोनालीच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या हाती सोनालीचे आर्थिक व्यवहार, बँक डिटेल्स, घर, जमीन, फार्म हाऊस यांचे तपशील आले आहेत. याशिवाय सोनालीची मुलगी यशोधरा आणि सोनालीचे इतर नातेवाईक यांच्या जबान्या नोंदवल्या गेल्या आहेत. हे पथक लवकरच राज्यात दाखल होणार असून या प्रकरणाच्या अधिकच्या तपासासाठी या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

फार्म हाऊसवरून साहित्य लंपास करणारा ताब्यात

सोनाली फोगट यांच्या हिस्सार येथील फार्म हाऊसवरून मुख्य आरोपी सुधीर सांगवान याच्या सूचनेवरून सीसीटीव्ही, डीव्हीआर, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे लंपास करणाऱ्या शिवम नामक व्यक्तीला हिस्सार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने आपण सांगवान याच्या सूचनेवरूनच हे कृत्य केल्याचे सांगितले आहे. गोवा पोलिसही शिवमची कसून चौकशी करत आहेत.

बाटलीत सापडले ड्रग्स

सोनाली फोगट यांना त्यादिवशी पार्टीमध्ये ज्या बाटलीमधून ड्रग्स पाजण्यात आले, ती बाटली आणि बाटलीतील ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे. साक्षी पुराव्यासाठी ते महत्त्वाचे ठरणार आहे. बाटलीतील पाजलेले ट्रक आणि संशयितांनी सांगितलेले ड्रग्स एकच असून आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सक्सेना यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT