Goa Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

Goa Police: गोव्यातील वेश्‍या रॅकेटशी संबंधित असलेल्या आंध्रप्रदेश व हरियाणा येथील दोघाजणांना क्राईम ब्रँच व सायबर क्राईम कक्षाच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cyber Police Block Website

पणजी: एस्कॉर्ट सर्व्हिस संकेतस्थळाच्या नावाखाली गोव्यातील वेश्‍या रॅकेटशी संबंधित असलेल्या आंध्रप्रदेश व हरियाणा येथील दोघाजणांना क्राईम ब्रँच व सायबर क्राईम कक्षाच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सुमारे ७८ अश्‍लिल एस्कॉर्ट सर्व्हिस संकेतस्थळे ब्लॉक करण्यात आल्याची माहिती क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची नावे सय्यद उस्मान (५४, आंध्रप्रदेश) व महम्मद महबुल्ला (३०, हरियाणा) अशी आहेत. हे संशयित एस्कॉर्ट सर्व्हिस संकेतस्थळावर महिलांची अश्‍लिल छायाचित्रे प्रसिद्ध करून गोव्यात एस्कॉर्ट सेवेची माहिती देत होते. त्यानंतर ते ग्राहक व दलाल यांच्या संपर्क साधायचे.

ग्राहकांनी केलेल्या मागणीनुसार हे संशयित दलालाशी संपर्क साधत असे. त्यानंतर रोख किंवा गुगल पे किंवा पेटीएम मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पैशांचा व्यवहार होत होता. त्यातून या संशयितांना कमिशनचा मोबदला मिळत असे. हे संशयित बंगळुरू, चेन्नई व भारतातील इतर मोठ्या शहरांमध्ये एस्कॉर्ट सेवांसाठी समान संकेतस्थळे चालवत होते. ज्या संकेतस्थळाद्वारे तपासकाम सुरू आहे ते आधीच काढून टाकण्यात आली आहे अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

संशयितांनी एस्कॉर्ट संकेतस्थळ तयार करून त्यावरती तरुणींची अश्‍लिल छायाचित्रे अपलोड केली होती. त्यावर त्यांनी संपर्कासाठी मोबाईल क्रमांकही दिले होते. ग्राहक या क्रमांकावरीत संपर्क साधत होते. ग्राहकाची खातरमा केल्यानंतर संशयित ही माहिती तरुणी पुरवणाऱ्या दलालांना देत होते.

गोव्यात अशा प्रकारच्या एस्कॉर्ट सेवा उपलब्ध असल्याचे या संकेतस्थळावर नमूद केले होते. याची गंभीर दखल पोलिसांनी घेत याचा तपास सुरू केला होता. क्राईम ब्रँच व सायबर क्राईम कक्षाच्या पोलिसांनी संयुक्तपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास करत या संकेतस्थळे तयार करणाऱ्या संशयितांपर्यंत पोहचण्यास यश मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT