Online Gambling Racket Busted In Assagao Dainik Gomantak
गोवा

Betting in Goa: आसगावात चालणाऱ्या ऑनलाईन सट्टेबाजीचा हणजूण पोलिसांकडून पर्दाफाश; 12 जणांना रंगेहाथ पकडले

Online Gambling Racket Busted In Assagao: राज्यातील वाढत्या सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी गोवा पोलिस धडक मोहीमा राबवत आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली.

Manish Jadhav

Goa Police Online Betting Raid: राज्यातील वाढत्या सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी गोवा पोलिस धडक मोहीमा राबवत आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली. बुधवारी (19 फेब्रुवारी) हणजूण पोलिसांनी आसगाव येथे चालणाऱ्या ऑनलाईन सट्टेबाजीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी 12 जणांच्या मुसक्या आवळल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वसनीय माहितीच्या आधारे हणजूण पोलिसांनी आसगाव येथील रॉयल आसगाव रिसॉर्ट डी ब्लॉक प्लॅट क्रमांक 303 वर छापेमारी केली. यादरम्यान 3.50 लाखांच्या व्यवहारांसह ऑनलाईन जुगार खेळताना 12 जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी 7 लॅपटॉप आणि 8 मोबाईल जप्त केले. अटक केलेल्यांमध्ये राजस्थान आणि गुजरातमधील (Gujrat) लोक आहेत.

पोलिसांनी अटक केलेले आरोपी

1) असलम मोहम्मद (भिलवाडा, राजस्थान)

2) मोहम्मद हुसैन (चित्तोडगड, राजस्थान)

3) वसीम मोहम्मद (उदयपूर, राजस्थान)

4) अयान अली बुखारी (चित्तोडगड, राजस्थान)

4) अझान इरफान नागोरी (गुजरात)

6) वहोरा मोहम्मद अब्दुलकरीम (गुजरात)

7) वहोरम सलीमभाई (गुजरात)

8) महोन अल्फाज अब्दुलरशीद (गुजरात)

9) पठाण दिलशान खान (गुजरात)

10) मोहम्मद अफजल खान सोर्गार (राजस्थान)

11) मोहम्मद इनायत शाह (राजस्थान)

12) शराफत खान भीष्टी (राजस्थान)

दरम्यान, याप्रकरणी हणजूण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपींवर गोवा, दमण आणि दीव सार्वजनिक जुगार अधिनियम, 1976 मधील कलम 3 आणि 4 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT