Goa Cyber Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Fraud: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश: गोमंतकीयाकडून उकळले 2.63 कोटी; गुजरातमधील आरोपी गजाआड

Cyber Fraud In Goa: गोवा सायबर गुन्हे शाखेनं एका मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा छडा लावला आहे. तब्बल 2.63 कोटी रुपये फसवणूकीच्या प्रकरणात अहमदाबाद येथून एका संशयित आरोपीला अटक केली.

Sameer Amunekar

पणजी: गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं एका मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा छडा लावला आहे. तब्बल 2.63 कोटी रुपये फसवणूकीच्याया प्रकरणात अहमदाबाद येथून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीला सध्या पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.

थिवी, बार्देश येथील तक्रारदाराने सायबर गुन्हे शाखेकडे फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिझा नावाच्या थिवी येथील व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधला आणि गुंतवणुकीबाबत माहिती दिली. तसंच जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास भाग पाडलं. त्या व्यक्तीनं बँक व्यवहारांच्या माध्यमातून तक्रारदाराकडून 2.63 कोटी रुपयांची रक्कम उकळली.

तक्रार दाखल होताच, पीआय दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने बँक व्यवहारांचा सखोल मागोवा घेत संशयित आरोपींचा शोध सुरू केला.

विविध बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांच्या तपशिलांच्या आधारे पोलिसांनी संशयित रमेश कुमार यादव (वय ३९, रा. अहमदाबाद, गुजरात) याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अहमदाबादून त्याला अटक केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

मोठ्या परताव्याचं आमिष दाखवणाऱ्या अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी नागरीकांनी बाळगावी. अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी सतर्क राहण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT