Goa Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

Goa Police: सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गोवा सायबर क्राईम पोलिस स्थानकात नोंद झालेल्या गुन्ह्यांमधील सुमारे 152 मोबाईल फोन क्रमांक गेल्या एका महिन्यात ब्लॉक करण्यात आले आहेत.

Manish Jadhav

Cyber Crime Goa Police News

पणजी: सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गोवा सायबर क्राईम पोलिस स्थानकात नोंद झालेल्या गुन्ह्यांमधील सुमारे 152 मोबाईल फोन क्रमांक गेल्या एका महिन्यात ब्लॉक करण्यात आले आहेत. या स्थानकाकडे नोंद झालेल्या सायबर गुन्ह्यांमधील आणखी मोबाईल फोन क्रमांक ब्लॉक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या फोन क्रमांकाद्वारे अधिक लोक बळी पडू नयेत म्हणून हा प्रयत्न असल्याची माहिती क्राईम ब्रँच पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

सायबर गुन्हेगारी

दरम्यान, राज्यात अनेक लोक सायबर गुन्ह्यांना बळी पडत असल्याने सायबर क्राईम कक्षातर्फे ‘सायबर सुरक्षित गोंय’ या मोहिमेअंतर्गत संगणक शिक्षकांसाठी शिक्षण विभागाच्या सहकार्याने पर्वरी येथे एससीईआरटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हायस्कूलच्या संगणक शिक्षकांसाठी चार दिवसांच्या सायबर क्राइम (Cyber Crime) जनजागृती सत्राचा समारोप झाला.

या प्रशिक्षणात एकूण 450 हायस्कूल संगणक शिक्षकांनी हजेरी लावली. या शिक्षकांकडून (Teacher) मिळालेला उदंड प्रतिसाद जे गोवा आणि समाजातील सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबद्दल शिक्षित करतील. सायबर गुन्ह्यांमधील नवीनतम ट्रेंड आणि या गुन्ह्यांना बळी पडू नये म्हणून आपण काय उपाययोजना करणे आवश्यक आहे.

आणखी 167 सायबर स्वयंसेवकांना प्रशिक्षण

आणखी सुमारे 167 सायबर स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरुन त्यांचा राज्यभरात सायबर जागरूकता निर्माण करण्यासाठी उपयोग करता येईल, असे अधीक्षक गुप्ता म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT