Goa Police Attack Dainik Gomantak
गोवा

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Goa Police Attack In Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात गोवा पोलिसांच्या पथकावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Goa Police Attack: मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात गोवा पोलिसांच्या पथकावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या गोवा पोलिसांवर 15 ते 20 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या हल्ल्यात गोवा पोलिसांचे एक उपनिरीक्षक आणि एक पोलीस हवालदार गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात (Goa) झालेल्या मोठ्या घरफोडीच्या प्रकरणात अलीराजपूर जिल्ह्यातील काही आरोपींचा सहभाग असल्याची खात्रीलायक माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गोवा पोलिसांचे एक पथक अलीराजपूरमधील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचले होते. स्थानिक पोलीस ठाण्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गोवा पोलीस जेव्हा परतत होते, त्याचवेळी हा घातपात झाला. साधारण 15 ते 20 अज्ञात तरुण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी पोलिसांच्या वाहनाला घेरले. या हल्लेखोरांकडे दगड आणि धारदार शस्त्रे होती. तोंड झाकलेल्या या गुंडांनी काही कळण्याच्या आतच पोलिसांवर दगडफेक सुरु केली आणि शस्त्रांनी वार केले.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांना सावरण्याची संधी मिळाली नाही. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच अलीराजपूरचे पोलीस अधीक्षक रघुवंत सिंह भदौरिया यांनी तातडीने जोबट गाठले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

गोवा पोलिसांवर (Goa Police) झालेला हा हल्ला स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांनी जाणीवपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी धरपकड सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT