Jail  Dainik Gomantak
गोवा

जामिनावर सुटल्यानंतर 3 दिवसात परत गजाआड; म्हापसा पोलिसांची कारवाई

पोलिसांच्या पथकाने विश्वसनीय माहिती मिळवली आणि तीन आरोपींना म्हापसा येथे पकडले.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून तीन दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या तीन आरोपींनी म्हापशात परत चोरी केली. यावेळेस त्यांनी म्हापसा येथील एका खाजगी इमारतीत असलेल्या कार्यालयातून तीन मोबाईल फोन आणि 70 हजारांची रोकड लंपास केली. म्हापसा पोलिसांनी तिघांना परत अटक केली आहे. (goa police arrested thieves in Mapusa)

पोलिसांनी रमेश वडार (37), संजय बने (26), मोहम्मद शेख (28, सर्व मूळ कर्नाटक) यांच्याकडून मोबाईल फोन आणि रोख 16,000 रुपये जप्त केले आहेत. गुरूवारी म्हापसा येथील एका खाजगी कार्यालयातून व इतर तीन कार्यालयांतून चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान, पोलिसांच्या पथकाने विश्वसनीय माहिती मिळवली आणि तीन आरोपींना म्हापसा येथे पकडले. चौकशीत या तिघांनी चोरीत आपला सहभाग असल्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारची चोरीची घटना एका खाजगी इमारतीत घडली होती, या तिघांनीच ती केली असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी म्हापसा पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT