CBI Raids Dainik Gomantak
गोवा

Ponda: बाल लैंगिक साहित्य सोशल मिडियावर शेअर केल्याप्रकरणी फोंड्यातील एकाला अटक

सात पैकी पाच ठिकाणी काहीच साडले नाही.

Pramod Yadav

ऑनलाइन बाल लैंगिक अत्याचार तसेच बाल लैंगिक साहित्य (चाइल्ड पोर्नोग्राफी) याप्रकरणी सक्त कारवाई केली जात आहे. ऑनलाइन बाल लैंगिक साहित्य पाहणे किंवा शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. मागील काही दिवसांपासून सीबीआय याकडे विशेष लक्ष देत असून, देशभरात विविध ठिकाणी छापे टाकत अनेकांना अटक केली आहे. गोव्यात देखील काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान, बाल लैंगिक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केल्याप्रकरणी फोंड्यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

गजेंद्र तदाडीकर (वय 35) याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल लैंगिक साहित्य असलेल्या साईटला वारंवार भेट देणाऱ्यांची माहिती आयपी पत्त्याचा वापर करून मिळाली होती. गोव्यातील अशी सात ठिकाणे सापडली होती. यानंतर सायबर विभाग, गुन्हे शाखा आणि जिल्हा पोलिस यांच्यासह टीम तयार करण्यात आल्या. सातही ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात आली. सात पैकी पाच ठिकाणी काहीच साडले नाही. पण, पणजी आणि फोंडा येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान, पणजीतील इसमाकडे कोणतेही बाल लैंगिक साहित्य सापडले नाही. पण, फोंड्यातील व्यक्तीकडे यासंबधित पुरावे सापडले. अटक गजेंद्र यांच्या मोबाईची हिस्ट्री तपासली असता त्यात, बाल लैंगिक साहित्य असलेल्या बेवसाईट सापडल्या तसेच, त्याने त्या शेअर देखील केल्या होत्या. आरोपीने हे साहित्य फेसबुकवर देखील शेअर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

सायबर विभागामार्फत अवैध सायबर गोष्टींकडे पोलिसांचे कटाक्षाने लक्ष देत आहेत. अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. देश पातळीवर करण्यात आलेल्या तपासात सीबीआय पथकाने गोव्यात देखील तपास केला होता. यावेळी दोन घटना समोर आल्या होत्या. पण, त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा न सापडल्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT