Goa Police Arrested A 26 Year Old Kerala Youth Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने 35 लाखांना गंडा लावणारा केरळचा तरुण गजाआड; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Goa Police Arrested A 26 Year Old Kerala Youth: ज्यादा परतावा देण्याचे आश्‍वासन देऊन फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने पर्वरी येथील रहिवाशाला 35.64 लाखांचा गंडा घालणाऱ्या केरळमधील मलप्पूरम येथील 26 वर्षीय मोहम्मद हाजीश याला अटक केली.

Manish Jadhav

पणजी: ज्यादा परतावा देण्याचे आश्‍वासन देऊन फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने पर्वरी येथील रहिवाशाला 35.64 लाखांचा गंडा घालणाऱ्या केरळमधील मलप्पूरम येथील 26 वर्षीय मोहम्मद हाजीश याला अटक केली. हा गुन्हा 16 ऑगस्टपूर्वी 2 टेलिग्राम खात्याद्वारे घडला होता. या गुन्ह्यामध्ये एकूण 1 कोटी 11 लाख रुपयांच्या रकमेसह संशयिताचे बँक खाते पाच वेगवेगळ्या राज्यांतील अशाच फसवणुकीशी जोडलेले असल्याने त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सायबर गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी दिली. पुढील तपास सायबर गुन्हे कक्षाच्या पोलिस करीत आहेत.

पर्वरीत पोलिस तक्रार

सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पर्वरी येथील एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, 16 ऑगस्ट 2024 पूर्वी अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी टेलिग्राम व सोशल मीडियाच्या इतर माध्यमांद्वारे संपर्क साधून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले.

35.64 लाखांची फसवणूक

त्यानंतर तक्रारदाराला एक अॅप डाऊनलोड करण्यास लावले. त्या अॅपद्वारे तक्रारदाराला विविध बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडले. काही काळानंतर संबंधित अॅपमधील तक्रारदाराचे खाते ब्लॉक करण्यात आले. याच दरम्यान फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात धाव घेत आपली सुमारे 35.64 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.

मुरगावातील महिलेला 1 कोटींचा गंडा

काही दिवसांपूर्वी, शेअर ट्रेडिंगमधून भरमसाट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुरगाव येथील एका महिलेची 1 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने जॉन पीटर हुस्मान याला अटक केली होती. पीटरविरोधात भादंसंच्या कलम 419, 420 आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 ‘डी’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. संशयित जॉन पीटर हुस्मान या नावाच्या इसमाने व्हॅट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे संपर्क साधून महिलेला शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास त्यातून मोठा मोबदला देण्याचे आमिष दाखवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: तपासाची चक्रे फिरली अन् 'सुसान' जाळ्यात अडकली! वार्का ड्रग्ज प्रकरणाला 'आंतरराष्ट्रीय' वळण; अमेरिकन महिलेला गोव्यात बेड्या

Goa Night Club Fire: 'फायर अलार्म' वाजलाच नाही'! आर्थिक फायद्यासाठी लुथरा बंधूंचा लोकांच्या जीवाशी खेळ; सरकारी पक्षाचा गंभीर आरोप

Goa Night Club Fire: 'क्लबमध्ये ‘पायरो’ पेटवणारे अजूनही मोकाटच!', लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; 5 फेब्रुवारीला फैसला

Tuyem Government Hospital: तुये इस्पितळासाठी 'फास्ट ट्रॅक' तयारी! कंत्राटी कर्मचारी भरतीचाही मार्ग मोकळा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Goa Crime: बायकोच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या 24 तासांत नवऱ्यानही संपवलं जीवन; उत्तर प्रदेशच्या दाम्पत्याचा गोव्यात दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT