Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Murder Case: 1990 साली गुजरातमध्ये केला खून, 35 वर्षांपासून देत होता पोलिसांना गुंगारा; अखेर गोव्यात अटक

Murder Accused Arrested In Goa: खून प्रकरणात गेल्या 35 वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे.

Manish Jadhav

Goa Police Arrest Murder Accused On The Run For 35 Years In Salcete

खून प्रकरणात गेल्या 35 वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. सासष्टी येथील राय येथे गोवा पोलिसांनी ही यशस्वीरित्या कारवाई केली.

गोवा पोलिसांची कारवाई

दरम्यान, गुजरातमधील राजकोट येथील लोधिक पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरिक्षक अरुण गौंस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खूनी आरोपीला बेड्या ठोकल्या. बसप्पा असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा यादगीर, कर्नाटक येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 1990 मध्ये दाखल झालेल्या खून खटल्यासंदर्भात त्याला अटक करण्यात आली.

सासष्टीत आरोपीला पोलिसांनी गाठले

स्थानिक गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने एएसआय उदय वेळीप यांच्या नेतृत्वाखालील सोमनाथ नाईक, अमरदीप चौधरी आणि धीरज नाईक यांच्या पथकाने सोमवारी (24 फेब्रुवारी) सासष्टी येथील राय येथे आरोपीचा शोध घेऊन अटक केली. मडगावचे एसडीपीओ शिवराम वैंगणकर आणि दक्षिण गोवाचे एसपी टिकम सिंह वर्मा यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.

तीन दशकांहून अधिक काळ आरोपीने पोलिसांना चकवा दिला

तीन दशकांहून अधिक काळापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला बीएनएसएस 2023 च्या कलम 35 अंतर्गत अटक करण्यात आली. अटकेनंतर, राजकोट पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. तसेच, पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

SCROLL FOR NEXT