Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दिवसा गुन्हे करायचे, रात्री गोवा सोडून परत जायचे! इराणी टोळीचा 3 तासांत पर्दाफाश; महाराष्ट्रातील दोघांना अटक

Irani Gang Arrested: पोलिस अधीक्षकांनी सांगितले, की शेळपे धुळेर, म्हापसा येथे ६२ वर्षीय गीता शिरोडकर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोन अज्ञातांनी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला.

Sameer Panditrao

पणजी: उत्तर गोवा पोलिसांनी सकाळी इराणी स्नेचिंग टोळीचा पर्दाफाश केला. महाराष्ट्रातून आलेल्या या टोळीतील दोन सराईत स्नॅचर्सना पोलिसांनी अटक केली. ही टोळी गोव्यात येऊन दिवसा गुन्हे करायची आणि रात्री गोवा सोडून परत जायची, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

या दोघांवर गोव्यातील किमान चार प्रकरणांमध्ये सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असून, त्यांचा इतर राज्यांतही गुन्हेगारी इतिहास आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

पोलिस अधीक्षकांनी सांगितले, की १८ जुलैला सकाळी साडेसातच्या सुमारास शेळपे धुळेर, म्हापसा येथे ६२ वर्षीय गीता शिरोडकर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोन अज्ञातांनी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला.

त्या दोघांनी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून (क्र. एमएच-१४-एडब्ल्यू-३२१५) येत मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून संबंधितांवर बीएनएस कलम ११५(२), ३०४, ६२ सह ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना पान १ वरून

तात्काळ वायरलेस आणि व्हॉट्स अ‍ॅपद्वारे सतर्क केले. सकाळी १०. ५० वाजता जुने गोवे पोलिस ठाण्याचे बीट कर्मचारी देवेंद्र तारी आणि त्यांचे सहकारी गस्त घालत असताना नंदू बार, मेरशी येथे संशयित वाहन व व्यक्ती दिसल्याने त्यांचा पाठलाग केला.

लोकांच्या मदतीने एका आरोपीला पकडण्यात आले. आरोपी पळत असल्याने जमावाने त्याला बेदम मारहाण केली. पकडलेल्या संशयिताचे नाव अब्बास असलम जैदी (वय ३४ वर्षे, रा. ठाणे-महाराष्ट्र) असे असून, त्याला नंतर गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले.

याचदरम्यान दुसरा संशयित अपना घर, मेरशीजवळील डोंगरावर झुडपांमध्ये लपलेला आढळला. त्याचे नाव शरीफ शहा (रा. नाशिक-महाराष्ट्र) असून तोही पळून जात असल्याने जमावाने त्याला पकडून मारहाण केली. त्यालाही उपचारासाठी गोमेकॉत नेले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली हिरो एक्स्ट्रिम (एमएच १४ एडब्ल्यू ३२१५) ही दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

इतर राज्यांतही तपास सुरू

दोन्ही आरोपी हे महाराष्ट्रातील असून इतर राज्यांतही त्यांचा गुन्हेगारी इतिहास आहे का, हे तपासले जात आहे. तसेच जून महिन्यात गोव्यात घडलेल्या अन्य स्नॅचिंग प्रकरणांशी त्यांचा काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे. त्यांची माहिती इतर राज्यांतील पोलिसांनाही देण्यात आली आहे. ही कारवाई पणजीचे पोलिस अधीक्षक सुदेश नाईक, जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पाडवळकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली.

पोलिसांचा दक्षतेचा इशारा

अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा.

सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान दागिने घालणे टाळावे.

दुचाकीवरून अज्ञात व्यक्ती माहिती विचारण्याच्या बहाण्याने जवळ येत असेल, तर सावध व्हा.

चोरीचा प्रयत्न झाल्यास आरडाओरडा करा आणि आसपासच्या लोकांचे लक्ष वेधून पोलिसांना कळवा.

तात्काळ पोलिस हेल्पलाईनला किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्या.

म्हापसा, जुने गोवेतील चोरी प्रकरणांत सहभाग

२८ फेब्रुवारी : सुप्रिया शिरोडकर, पर्रा यांच्याकडून २ लाखांचे २८ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार

१७ एप्रिल : रोजी वैभवी पेडणेकर, करास्कावाडो, पर्रा यांच्याकडून ३२ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार

१७ एप्रिल : रोजी क्रिस्टालिना रॉड्रिग्स, बामणभाट, मेरशी यांच्याकडून सुमारे ९५ हजारांचे ३० ग्रॅमची सोनसाखळी चोरी झाल्याची तक्रार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT