Domnic D’Souza
Domnic D’Souza Dainik Gomantak
गोवा

गोव्यात बिलिव्हरपंथी धर्मगुरूला बेड्या

दैनिक गोमन्तक

म्हापसा : सडये येथील वादग्रस्त ख्रिस्ती बिलिव्हरपंथीय फोर्थ पिलर धर्मगुरू पास्टर डॉम्निक मास्कारेन्हास याला गुरुवारी रात्री बेकायदा धर्मांतरण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अटक केली. अटकेची माहिती मिळताच म्हापसा पोलिस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर बिलिव्हर पंथीयांनी गर्दी केली होती.

याप्रकरणी शिवोली येथील कृष्णा खोबरेकर आणि खोर्ली म्हापसा येथील निखिल शेट्ये यांनी म्हापसा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीस अनुसरून पोलिसांनी अटकेची कारवाई केली. संशयित मास्कारेन्हास याच्या विरोधात भादसं 153 (ए), 195, 502 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पास्टर डॉम्निक मास्कारेन्हास याने सध्या आजाराची सबब पुढे करीत स्वतःला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल करून घेतले आहे. सडये पंचायत क्षेत्रातील ट्रोपा येथील अवरलेडी ऑफ परसेक्युटेड चर्च परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिलिव्हर पंथाच्या डॉम्निक मास्कारेन्हास तसेच गटाकडून प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात येत आहे. दर रविवारी ट्रॉपा परिसरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येत असलेल्या बिलिव्हर पंथीयांच्या प्रार्थना सभांना हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित रहात असल्याने स्थानिक कॅथोलिक ख्रिस्ती समाज तसेच बिलिव्हर पंथीयांमध्ये अनेकदा खटके उडत होते. यासंदर्भात म्हापसा पोलिसांत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

गुरुवारी संध्याकाळी बिलिव्हर पंथाशी संबंधित खोबरेकर कुटुंबीयांकडून पास्टर डॉम्निक मास्कारन्हेस, त्याची पत्नी जोहान व अन्य लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पास्टर डिसोझा याला त्याच्या सडये येथील राहत्या घरातून अटक केली.

सडये शिवोली येथील फोर्थ पिलर चर्चचा धर्मगुरू डॉम्निक मास्कारेन्हास पूर्वी दररोज प्रार्थनासभा घ्यायचा. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने फक्त शनिवार आणि रविवारीच प्रार्थनासभा घेऊ लागला. वैद्यकीय कारणावरून मास्कारेन्हास याला जामीन मंजूर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

खोबरेकर, शेट्ये यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव

तक्रारदार कृष्णा खोबरेकर यांच्या पत्नीने बिलिव्हर्स पंथ स्वीकारून धर्मांतर करावे,यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. तसेच दुसरे तक्रारदार निखिल शेट्ये यांचे वडील आजारी असल्यामुळे त्यांच्या वडिलांना उपचारासाठी तेल दिले होते.त्यानंतर त्यांच्यावरही धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

अटकेमागे राजकीय डावाचा संशय!

विधानसभा निवडणुकीत डॉम्निक मास्कारेन्हास याने केला होता. त्यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये तो भाजपचा प्रचार करत होता.त्यामुळे या अटकेच्या कारवाई मागे राजकीय डाव असण्याचा संशय डॉम्निक समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT