गोवेकरांच्या ताटात परराज्यातील मासळी

1 जूनपासून मासेमारी बंदी : आंध्र आणि तामिळनाडूवर राहावे लागणार अवलंबून
Fish
Fish Dainik Gomantak

मडगाव : गोमंतकीयांच्या ताटात जर मासळी नसेल, तर कितीही सुग्रास भोजन असले तरी घशाखाली घास उतरतच नाही. त्यामुळे गोमंतकीयांना रोजच्या जेवणात मासळी हवीच. आता राज्यात 1 जूनपासून गोव्यासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर दोन महिन्यांसाठी मासेमारी बंदी लागू होत असून गोव्यासह जवळपासच्या राज्यातील ट्रॉलर्स बंद होणार आहेत. (Fish to be brought from other states in Goa)

Fish
पालिका क्षेत्रातील घरांचे होणार ‘जिओ मॅपिंग’

त्यामुळे गोवेकरांना आता परराज्यातील मासळी खावी लागणार आहे. मासळीप्रेमी गोंयकरांना आता आंध्र आणि तामिळनाडूहून येणाऱ्या मासळीवर भागवून घ्यावे लागणार आहे.

आणखी चार दिवसांनी मासेमारी बंदी लागू होत असल्याने गोव्यात आताच ट्रॉलर तडीवर आणून नांगरून ठेवण्यास सुरवात झाली आहे. आता केवळ पारंपरिक बोटवालेच मासेमारीसाठी दर्यात जात आहेत. पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी लागू झालेली असली तरी पूर्व किनारपट्टीवर मासेमारी सुरू असल्याने आता गोव्यात आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून प्रामुख्याने मासळी आणली जाणार आहे. ही मासळी फ्रिझर असलेले ट्रक आणि रेल्वेतून आणली जाते, अशी माहिती मडगाव होलसेल मासळी विक्रेते संघाचे अध्यक्ष मुल्ला इब्राहिम यांनी दिली.

Fish
गोव्यात टोमॅटोचे दर अजूनही वधारलेलेच

दर्या शांत राहिला तरच... : खराब हवामान असल्याने सध्या खोल पाण्यात बोटी जात नाहीत. सध्या ट्रॉलर तडीवर आणण्याचे काम सुरू असून ताजी मासळी मिळणार नसल्याने गोवेकरांना त्याचा आनंद घेता येणार नाही. मात्र, दर्या शांत राहिला तरच हे मासे गोंयकारांच्या ताटात पडू शकतील. तसेच खाजनातील माशांवर लोकांना जीभेचे चोचले पुरवावे लागणार आहेत. लवकरच मासेमारी बंद होणार असल्याने सुकी मासळी खरेदी करण्यासाठी लोक बाजारात गर्दी करू लागले आहेत.

पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथूनही गोव्यात काही प्रमाणात मासळी येते. पण हे प्रमाण बरेच कमी आहे. सध्याच्या तुलनेत पूर्व किनारपट्टीवरून येणारी मासळी 70 टक्के असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. गोव्यात पुढील दोन महिन्यांत यांत्रिकी बोटींनी मासेमारी करण्यास बंदी असली तरी पारंपरिक होड्यांनी जी मासेमारी केली जाते, त्यावर बंदी नाही. मात्र, पावसात दर्या खवळलेला असल्यास हे मासेमार दर्यात जात नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com