Fake Certificate Panjim Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: १० वी पास संचालकाने विद्यार्थ्यांना फसवलं, खोटी प्रमाणपत्रं देणाऱ्या शैक्षणिक संस्थेवर कारवाईची छडी

Panjim Educational Institute Scam: प्रदीप संस्थेचा संचालक म्हणून सही करायचा आणि ही टोळी मुलांकडून भरगोस पैसे घ्यायची

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील विविध ठिकाणी एकाहून एक गुन्ह्यांचा पर्दाफाश होतोय, फक्त पैसे कमावण्यासाठी सुरु असलेले कित्येक बेकायदीशीर उद्योग पोलिसांच्या नजरेस येत आहेत. बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची उकळ करणाऱ्या प्रदीप उर्फ विक्रांत हळर्णकर याला गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे. प्रदीप पणजीत व्हॉयलेट खांडेपाल ऑफ ग्रेस एज्युकेशन नावाच्या शैक्षणिक संस्थेत फसवेगिरी करायचा, त्याच्या या बेकायदेशीर कामाचा छडा लागताच गुन्हे खात्याने त्याला ताब्यात घेतलं आहे.

बोगस शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या प्रदीपचे फक्त दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तो स्थानिक मुलांना शाळेत ने-आण करण्याचं काम करायचा.

प्रदीप सोबत या संस्थेत रामकृष्ण परब ( कुंभारजुवे), भावेश बालकृष्ण हळदणकर( चोडण), निरज गोविंद गावडे (पिळगाव), विष्णूदास देमू भोमकर ( करमळी) आणि यशवंत रामा खोलकर (ताळगाव) हे देखील सामील होते. प्रदीप या बोगस संस्थेचा संचालक म्हणून सही करायचा आणि ही टोळी मुलांकडून भरगोस पैसे घ्यायची.

प्रदीप याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीस व्हॉयलेट खांडेपाल ऑफ ग्रेस एज्युकेशन संस्थेचे प्राचार्य जगदीशचंद्र खांडेपाल आणि त्यांच्या परिवाराचा शोध घेत आहेत. ही संस्था पणजीत वर्ष २०२० पासून सुरु आहे आणि या संस्थेत इयत्ता १० आणि १२च्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतल्यानंतर बनावट उत्तीर्ण प्रमाणपत्र दिले जायचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

SCROLL FOR NEXT