Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा पोलिस ‘ॲक्‍शन मोड’वर! 48 जणांना घेतले ताब्यात; 4 जणांना अटक

Goa Police: तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अँथनी नाडार, फ्रान्सिस नाडार व मिंगेल अराउजो या तीन संशयितांना प्रत्येकी ५० हजारांचा जामीन बाँड भरण्याचे निर्देश दिले.

Sameer Panditrao

पणजी: सांताक्रुझ येथे बुधवारी रात्री गोवा पोलिसांनी तीन हिस्ट्रीशिटर व आणखी एका व्यक्तीला अटक केली. अँथनी नाडार (३१), करीम बेपारी (३५), फ्रान्सिस नडार (२८) व मिंगेल अराउजो (२४) अशी संशयितांची नावे असून, चौघेही सांताक्रुझचेच रहिवासी आहेत. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिली.

तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अँथनी नाडार, फ्रान्सिस नाडार व मिंगेल अराउजो या तीन संशयितांना प्रत्येकी ५० हजारांचा जामीन बाँड भरण्याचे निर्देश दिले. मात्र त्‍यांनी ही अट पूर्ण न केल्याने त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.

४८ समाजकंटक दक्षिणेत ताब्‍यात

वाढत्या गुन्हेगारीच्‍या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा पोलिसांनी आता समाजकंटकांविरोधात कडक पावले उचलली असून, जिल्‍ह्यातील एकूण ४८ जणांना ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्‍यवस्था मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, धिंगाणा घालणे अशा प्रवृत्तीवर आम्ही कडक लक्ष ठेवून आहेत असे वर्मा यांनी सांगितले.

रोडरेजवरून हल्ला : चौघांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

रोडरेजवरून दोन भावांवर हल्ला चढविल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. काल बुधवारी दुपारी येथील जुन्या ‘हॉस्पिसियो’जवळ ही घटना घडली होती. अब्दुल नबावाले, इम्रान बेल्लारी, इमाम कास्सी व रेहान शेख अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, अधिक तपासासाठी त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. मोहम्‍मद रशीद यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. ते मूळ उत्तराखंड येथील असून सध्या बाणावली येथे राहतात. संशयितांनी सुरवातीला त्यांना मारहाण केली. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा भाऊ सहवीज आला असता त्यालाही बेदम मारहाण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Digital Taxi Policy: गोव्यात लवकरच नवीन 'टॅक्सी धोरण', 10 सप्टेंबरपर्यंत मसुदा तयार करण्याचे मुख्यमंत्री सावंतांचे निर्देश; बैठकीनंतर अखेर तोडगा

Rohit Sharma: 'अनुभव हीच त्याची सर्वात मोठी ताकद, रोहित असा लीडर आहे...' राहुल द्रविडकडून 'मुंबईच्या राजा'वर स्तुतीसुमनांचा वर्षाव

Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात, काणकोणात क्रीडांगणाचं केलं उद्‌घाटन, विद्यार्थ्यांशीही साधला संवाद

काँग्रेस आमदाराच्या गोव्यातील कॅसिनोंवर ईडीचे छापे; पहाटे पाचपासून झाडाझडती सुरु

Navpancham Rajyog 2025: 27 ऑगस्टपासून 'या' राशींसाठी 'शुभ काळ' सुरू, शुक्र बनवणार शक्तिशाली राजयोग; आर्थिक लाभ होणार

SCROLL FOR NEXT