Goa Crime: 'सोशल मीडिया'वरील मैत्री पडली महागात, आजारपणाच्या बहाण्याने 90 लाखांचा गंडा नंतर अत्याचार, आरोपी गजाआड

Margao Sexual assault case: सोशल मीडियावर मैत्री करून ‍प्रेमपाशात ओढून नंतर एका युवतीवर अत्याचार केल्याचा आराेप असलेल्‍या मेल्सन कुतिन्हो (३३) याने अटक केली त्याने ही अटक टाळण्‍यासाठी आजारी असल्‍याचा बहाणा केला.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सोशल मीडियावर मैत्री करून ‍प्रेमपाशात ओढून नंतर एका युवतीवर अत्याचार केल्याचा आराेप असलेल्‍या मेल्सन कुतिन्हो (३३) याने अटक केली त्याने ही अटक टाळण्‍यासाठी आजारी असल्‍याचा बहाणा करून स्वतःला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करून घेतले. मात्र, वैद्यकीय तपासणीत तो फीट असल्याचे दिसून आल्‍यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

या युवकाच्‍या विराेधात एका युवतीने कुंकळ्‍ळी पोलिसांत तक्रार दिली असून संशयिताने स्‍वत: आजारी असल्याचा बहाणा करून आपल्‍याकडून उपचारासाठी तब्बल ९० लाख रुपये घेतले आणि ते परत न करता फसविले, असेही त्‍या युवतीने म्‍हटले आहे.

Goa Crime
Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

या प्रकरणात पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहेत. संशयितावर भारतीय न्याय संहितेच्या ६४ (१), ३५१ (४), ३१८ (४) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

संशयित कुंकळ्ळीतील एका गावातील आहे. पीडित युवतीशी त्याने सोशल मीडियावरून फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवून नंतर मैत्री केली होती.

Goa Crime
Goa: स्‍मारक, मंदिरांचा विषय दुर्लक्षितच! सरकारला मिळेना जागा, प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया थंडावली

आजारपणाच्या बहाण्याने ९० लाखांचा गंडा

मध्यंतरी संशयिताने आपण आजारी असल्याचाही बहाणा रचला. पीडितेकडून ५० हजार रुपये घेतले. नंतर सुवर्णलंकार घेतले. हा एकूण आकडा ९० लाख इतका आहे. शेवटी आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्या पीडितेने यासंबंधी पोलिसांत तक्रार केल्यानंतर संशयिताचे भांडे फुटले.

ताब्यात घेतल्यानंतर त्याने अटक चुकविण्याचे सर्व प्रयत्‍न करून बघितले. बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर त्याने आरोग्याचे कारण पुढे केले. मागाहून त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो ठिकठाक असल्याचे स्पष्ट झाले. नंतर पोलिसांनी त्याची उचलबांगडी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com