Goa Crime: सिलिंडर डोक्यात हाणला, रोडरेजवरून 2 सख्ख्या भावांना चार ते पाच जणांकडून मारहाण

Margao: रोडरेजवरून दोन सख्ख्या भावांना मारहाण करण्याची घटना बुधवारी मडगावच्या जुन्या हॉस्पिसियो नजीक घडली. संशयितांनी सुरुवातीला राशिद अली यांना मारहाण केली.
Goa Crime | Goa road rage
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Criminal cases Goa 2025

मडगाव: रोडरेजवरून दोन सख्ख्या भावांना मारहाण करण्याची घटना बुधवारी मडगावच्या जुन्या हॉस्पिसियो नजीक घडली. संशयितांनी सुरुवातीला राशिद अली यांना मारहाण केली, त्याला वाचविण्यासाठी शाकीद अली हा आला असता, त्यालाही बेदम मारहाण केली. त्यानंतर संशयित पळून गेले. सध्या त्यांचा शोध चालू असल्याचे फातोर्डा पोलिसांनी सांगितले.

दोघे संशयित दुचाकीवरून आले होते. त्यांनी राशिद अली याच्या दुचाकीसमोर गाडी घालत त्याला अडवले. त्यानंतर गाडी लावल्याचे कारण देत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Goa Crime | Goa road rage
Goa Food Adulteration Cases: पाच वर्षांत राज्‍यात अन्न भेसळीची 43 प्रकरणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

राशिद जीवाच्या आकांताने नजीकच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीत लपला व त्याने पोलिसांना कॉल केला. त्यानंतरही संशयितांनी आणखी काहींना बोलावून घेत आरोग्य केंद्रातील सिलिंडर राशिदच्या डोक्यावर हाणला.

राशिदने दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाचजणांनी मारहाण केली. त्यांच्याकडे चाकूही होता व त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com