Merces POCSO court acquittal Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: पीडिताच ठरली ‘फितूर’, आरोपीशी केलं लग्न, अत्याचार प्रकरणी कोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता; काय नेमंक प्रकरण?

Merces POCSO court acquittal: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका प्रकरणात पीडितेने न्यायालयात धक्कादायक वळण घेतले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका प्रकरणात पीडितेने न्यायालयात धक्कादायक वळण घेतले. माझे आरोपीसोबत लग्न झाले असून मला त्याच्याविरुद्ध कोणतीही साक्ष द्यायची नाही, अशी साक्ष पीडितेने नोंदवल्यामुळे मेरशी येथील ‘पॉक्सो’ न्यायालयाने संशयित विक्रम भिंगारदिवे याची निर्दोष मुक्तता केली.

१८ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने २ आणि ३ जून २०२४ दरम्यान नागोवा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये पीडितेशी लग्नाचे खोटे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनावणी दरम्यान, मुख्य साक्षीदार असलेल्या पीडितेने आपली बाजू पूर्णपणे बदलली. तिने न्यायालयात स्पष्ट केले की, तिचा आता आरोपीशी विवाह झाला असून तिला त्याच्याविरोधात काहीही बोलायचे नाही. न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, पीडिता, जी या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची साक्षीदार आहे, ती पूर्णपणे ‘फितूर’ झाली आहे. तिने स्वतःच संशयिताशी लग्न झाल्याचे कबूल केल्यामुळे आता त्याला दोषी ठरवण्यासाठी कोणताही ठोस पुरावा उरलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT