Goa Pocso Case  Dainik Gomantak
गोवा

POCSO Case Goa: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

Nepalese Man Acquitted In POCSO Case: टेक कामी याच्यावर पर्वरी येथील राहत्या घरी जुलै २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान आपल्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत आरोप ठेवण्यात आलेल्या ३८ वर्षीय नेपाळी नागरिक टेक कामी यांची पणजी येथील विशेष जलदगती न्यायालयाने (पॉक्सो) सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.

पीडित मुलीने आपली साक्ष मागे घेत, रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचे न्यायालयात स्पष्ट केल्याने न्यायालयाने आरोपीला ‘संशयाचा फायदा’ देत मुक्त केले. पर्वरी पोलिस ठाण्यात १४ एप्रिल २०२६ रोजी नोंद झालेल्या गुन्ह्यानुसार

टेक कामी याच्यावर पर्वरी येथील राहत्या घरी जुलै २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान आपल्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी १५ एप्रिल २०२६ रोजी त्याला अटक केली होती. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, ६२, ११५ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ८ व १८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

रागात खोटी लैंगिक अत्याचाराची तक्रार

पीडित मुलीने न्यायालयात साक्ष देताना सर्व आरोप फेटाळून लावले. वडिलांवर राग आल्याने आपण खोटी तक्रार केली होती, अशी कबुली तिने दिली. मुलीने सर्वप्रथम तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि खाजगी शिक्षिकेला वडिलांनी केवळ ''मारहाण'' केल्याचे सांगितले होते; लैंगिक अत्याचाराचा कोणताही उल्लेख केला नव्हता. काही आठवड्यांनंतर बाल कल्याण समितीसमोर पहिल्यांदा अत्याचाराचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात लैंगिक अत्याचार झाल्याचे सिद्ध करणारे कोणतेही वैद्यकीय पुरावे समोर आले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT