POCSO Case Dainik Gomantak
गोवा

POCSO Case: सामान्य आरोपीला अटक, मग पोलीस अधिकाऱ्याला वेगळी वागणूक का? पोक्सो प्रकरणी गोम्स यांचा सवाल!

Child Sexual Abuse Case: ‘गोमन्तक’ टीव्हीच्या ‘साश्टीकार’ कार्यक्रमात बोलताना गोम्स यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक विकास देईकर यांच्याविरोधात पोक्सो कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, इतका गंभीर गुन्हा नोंद होऊनही त्यांना अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांनी उपस्थित केला.

‘गोमन्तक’ टीव्हीच्या ‘साश्टीकार’ कार्यक्रमात बोलताना गोम्स यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोक्सो कायद्याखाली गुन्हा नोंद होणे ही गंभीर बाब आहे. संबंधित अधिकाऱ्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असला, तरी कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांनी भेदभाव करू नये.

सामान्य व्यक्तीविरुद्ध असा गुन्हा नोंद झाला असता, तर आतापर्यंत अटक झाली असती. मग पोलीस अधिकारी असल्यामुळे देईकर यांना वेगळी वागणूक दिली जात आहे का, असा सवाल त्यांनी केला. देईकर यांच्याविरोधात यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याचा दावा करून त्या प्रकरणाचीही चौकशी का झाली नाही, असा प्रश्न गोम्स यांनी उपस्थित केला. या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

''त्या’ महिलेचीही चौकशी करा

या प्रकरणात गुन्हा नोंद झालेल्या महिलेच्या भूमिकेचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ‘बायलांचो एकवोट’च्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी केली. संबंधित महिला रात्री अल्पवयीन मुलीला पोलीस स्थानकात घेऊन जात असे आणि तिला निरीक्षकांच्या केबिनमध्ये पाठवत असे, या प्रकाराबाबत त्यांनी संशय व्यक्त केला. ही महिला खरोखरच स्वयंसेवी संस्थेशी संबंधित आहे की अन्य कारणासाठी मुलींना आणत होती, याची चौकशी व्हावी, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: जनतेचा मंच की तिकिटाचा पंच?

Crime News: कुटुंबीयांशी वाद, ग्रामस्थांना धमकी अन् पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; कोयते घेऊन तरुण जंगलात पसार!

ST Reservation: एसटी आरक्षणाचा कायदेशीर अडथळा दूर करण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात; तवडकरांचा विश्वास

Child Abuse Case: बाणावलीत दोन चिमुरड्या बहिणींवर काकाचा अमानुष छळ; गरम मेणाचे चटके दिल्याचा आरोप

Mormugao Raja Case: 'तुमच्या हट्टासाठी पोलिस यंत्रणा का?' मुरगावचा राजा प्रकरणी उच्च न्यायालय संतप्त; खर्च वसुलीचेही संकेत!

SCROLL FOR NEXT