फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मडकई भाजप मंडळाचे अध्यक्ष प्रदीप शेट व इतर.  Dainik Gomantak
गोवा

कोविड लसीकरणासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न कौतुकास्पद: मडकई भाजप

कोविड काळात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर यशस्वी मात करीत देशवासीयांना दिलासा दिला.

Dainik Gomantak

Goa: ‘कोविड’विरोधी यशस्वी लढा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कोविड लसीकरण (Corona Vaccination) शंभर टक्के करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल देशवासीयांना अभिमान आहे. पंतप्रधानांच्या या कार्यात गोव्याचाही (Goa) पूर्ण पाठिंबा आणि सहभाग आहे, असे मडकई भाजप (BJP) मंडळाचे अध्यक्ष प्रदीप शेट यांनी फोंड्यात (Ponda) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मडकई भाजप मंडळाचे सदानंद फडते, तुळशीदास नाईक तसेच किर्लपालकर उपस्थित होते.

प्रदीप शेट म्हणाले की, कोविड काळात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर यशस्वी मात करीत देशवासीयांना योग्य दिलासा दिला. विरोधीपक्षांनी केवळ अपप्रचार करीत कोविडविरोधी लढ्याला पाठिंबा नव्हे तर विरोधच केला. अशावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शंभर टक्के लसीकरणावर भर देताना सर्वांना आश्विस्त केले. देशाची धुरा सध्या योग्य व्यक्तीच्या हातात असून देशवासीयांचा पूर्ण पाठिंबा नरेंद्र मोदी यांना आहे, असेही शेट म्हणाले. यावेळी किर्लपालकर तसेच सदानंद फडते व तुळशीदास नाईक यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोविडविरोधी मिशनला गोमंतकीयांचा पूर्ण पाठिंबा असून त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Case: 'नीलेश शिरवईकरला बडतर्फ करा'! नावेलीवासीयांची मागणी; एडबर्ग मारहाणीच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा

Goa Politics: खरी कुजबुज; पेडणे तालुका नेहमीच चर्चेत

Goa Vehicle Sales: गोव्यात दिवाळीदरम्यान 'रेकॉर्डब्रेक' वाहन खरेदी! GST कपातीमुळे ग्राहकांची पसंती; 11317 गाड्यांची नोंदणी

Horoscope: मोठा धमाका! अडकलेले पैसे मिळणार; आठवड्याची सुरुवात 'या' राशींना देणार भरभरून

Montha Cyclone: ‘मोंथा’बाबत मोठी अपडेट! 'गोव्यात' पाऊस थांबणार की नाही? वाचा माहिती..

SCROLL FOR NEXT