PM Internship Scheme Dainik Gomantak
गोवा

PM Internship Scheme: 'प्रधानमंत्री इंटर्नशीप'ला थंड प्रतिसाद! राज्‍यातील केवळ 8 जणांकडूनच नोंदणी

Goa Internship Scheme Registration: प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्य प्रशिक्षण मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्‍यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना (पीएमआयएस) सुरू केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्‍यासह देशभरातील सुशिक्षित तरुण-तरुणींना देशातील पहिल्या ५०० नामांकित कंपन्यांमध्ये १२ महिन्यांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्य प्रशिक्षण मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्‍यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना (पीएमआयएस) सुरू केली आहे. परंतु, आतापर्यंत गोव्‍यातील केवळ आठ तरुणांनीच या योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्‍होत्रा यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून हे वास्‍तव समोर आले आहे.

योजनेस सुरवात केल्‍यानंतर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने विविध माध्‍यमातून योजनेची देशभर जागृती केली. त्‍यामुळे १६ जुलै २०२६ पर्यंत देशभरातील ९८ हजार तरुण-तरुणींनी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. त्‍यात गोव्‍यातील केवळ आठजणांचाच समावेश असल्‍याचे उत्तरातील आकडेवारीतून दिसून येते.

काय आहे योजना?

देशातील सुशिक्षित तरुण-तरुणींना देशातील पहिल्या ५०० नामांकित कंपन्यांमध्ये वर्षभराचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्य प्रशिक्षण देण्‍यात येते.

अशा तरुण-तरुणींच्‍या बँक खात्‍यांत प्रत्‍येक महिन्‍याला ९ हजार रुपये आर्थिक मदत जमा केली जाते.

इंटर्नशीप सुरू करताना प्रवासासाठी आणि इतर खर्चासाठी ६ हजार रुपये एकरकमी दिले जातात.

इंटर्नशीप पूर्ण झाल्यानंतर नामांकित कंपन्यांकडून अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते, जे नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते.

पात्रता काय?

अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्जदार १० वी, १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा पदवीधर असावा.

अर्जदार पूर्णवेळ नोकरी करत नसावा.

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंग्रजीचा प्रश्न अन् पाकिस्तानी तरुणानं दिलं वेगळंच उत्तर! Video Viral होताच नेटकऱ्यांनी धरलं डोकं, म्हणाले 'याला काहीच समजलं नाही, पण कॉन्फिडन्स...'

Yellow Fever Vaccine Shortage: पिवळ्या तापाची लसच मिळेना; विदेशगमनाला 'ब्रेक', रोजगारासाठी जाणाऱ्या गोमंतकीयांची महिनाभरापासून कोंडी

Goa Land Grabbing Case: 'जमीन हडप' विशेष न्यायालयाला घटनात्मक आव्हान; गोवा सरकारला हायकोर्टाची नोटीस, आरोप निश्चितीला स्थगिती

Child Welfare Committee: 'बाल कल्याण समिती'च्या तिघांवर निलंबनाची कारवाई! हलगर्जीपणा, पक्षपातीपणाचा ठपका; चौकशी सुरू

Dhruv Jurel Century: 'जय जवान, जय किसान' शतक ठोकताच ध्रुव जुरेलचं अनोखं सेलिब्रेशन! टॅटू दाखवला अन्... Watch Video

SCROLL FOR NEXT