Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: गाडी सापडली कणकवलीत, संशयितांकडून बेदम मारहाण; पीर्ण येथील खूनप्रकरणाचा वाचा घटनाक्रम..

Pirna Murder Case: कपिलने गुरुदत्तकडून थार गाडी भाड्याने घेतली होती. ही गाडी महाराष्ट्राच्या हद्दीत नेल्याच्या वादातून मारहाण आणि त्याचे रूपांतर हत्येमध्ये झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: पीर्ण येथील खुल्या पठारावर शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील १९ वर्षीय कपिल चौधरी हा युवक मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी १५ तासांत छडा लावत रेंट अ कार व्यावसायिकासह दोघांना अटक केली. रेंट अ कार चोरल्याच्या संशयातून या तरुणाला जबर मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी रेंट अ कार व्यावसायिक गुरुदत्त लवंदे (वय ३१ वर्षे, रा. कांदोळी), डेसन कुतिन्हो (वय ३१ वर्षे, रा. कळंगुट), सूरज ठाकूर (वय २१ वर्षे, रा. कांदोळी) या तिघांना अटक केली आहे. पोलिस अन्य काही साथीदारांच्या मागावर आहेत.

या प्रकरणातील मुख्य संशयित गुरुदत्त याचा रेंट अ कार व्यवसाय आहे. कपिलने गुरुदत्तकडून थार गाडी भाड्याने घेतली होती. ही गाडी महाराष्ट्राच्या हद्दीत नेल्याच्या वादातून मारहाण आणि त्याचे रूपांतर हत्येमध्ये झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस इतरही बाजूने तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर कपिलच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.

वडील श्रीनिवास सिंग यांनी कपिलच्या मृतदेहाची ओळख पटविली. तसेच आपल्या मुलाचा अज्ञातांनी खून करून त्याची बॅग व मोबाईल चोरल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.

...अन् कपिलची ओळख पटली

या प्रकरणाचे तपासकाम सुरू असतानाच श्रीनिवास सिंग (वय ४६ वर्षेे, रा. उत्तर प्रदेश) यांनी कोलवाळ पोलिस स्थानकात येऊन सांगितले की, त्यांचा मुलगा कपिल चौधरी हा गोव्याला जातो म्हणून घरातून निघाला होता. पण त्याचा फोन लागत नाही. त्याचे शेवटचे लोकेशन हे थिवीमध्ये दाखवत होते. पोलिसांनी बेपत्ता तरुण आणि पीर्ण येथील तरुणाच्या मृतदेहाचे वर्णन जुळवून पाहिले असता, तो कपिल चौधरी असल्याचे उघडकीस आले.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न फसला

संशयित गुरुदत्तने आपल्या साथीदारांच्या मदतीने कपिलला लाथा-बुक्क्यांनी तसेच दंडुक्याने बेदम मारहाण करून त्याला घटनास्थळी सोडून पळ काढला. तसेच जाताना त्याच्या अंगावर दारू ओतून रिकामी बाटली तेथेच सोडून दिली. जेणेकरून ही व्यक्ती दारूच्या नशेत आहे, असे भासविण्याचा संशयितांचा प्रयत्न होता.

नेमके काय घडले?

१. कपिलने गुरुदत्तकडून ३० ऑक्टोबरला जीए-०३-एच-५२५४ क्रमांकाची थार गाडी भाड्याने घेतली होती. या गाडीला जीपीएस ट्रॅकर होता.

२. ही गाडी गोव्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे समजल्यावर गुरुदत्तने मित्रांसोबत कारने थारचा पाठलाग करीत ती शोधली.

३. थार गाडी कणकवलीत सापडली. यावेळी गाडीत कपिल होता. संशयितांनी कपिलला थार गाडीसोबत पीर्ण येथील पठारावर नेले.

४. संशयितांनी कपिलला लाथा-बुक्क्यांनी तसेच दंडुक्याने बेदम मारहाण केली आणि त्याच अवस्थेत सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT