PFI NIA Dainik Gomantak
गोवा

PFI Goa Connection : बिल्डर, बड्या व्यावसायिकांचे ‘पीएफआय’शी संबंध उघड

प्रतिबंधात्मक कारवाईनंतर आता कित्येकांनी आमचा या संस्थेशी संबंध नव्हता, असे सांगत हात वर केले आहेत.

सुशांत कुंकळयेकर

PFI Goa Connection : गेल्या काही वर्षांत गोव्यात बस्तान बसविलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेशी संबंधित बहुतेक सदस्य गोव्यातील प्रस्थापित व्यावसायिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आता त्यातील कित्येकांनी आमचा या संस्थेशी संबंध नव्हता, असे सांगत हात वर केले आहेत.

सध्या पोलिसांनी गोव्यातील या संघटनेच्या कार्यालयाची झडती घेतली असून या कार्यालयात कोण कोण येत होते, याची चौकशी सुरू आहे. तथापि, बुधवारी ताब्यात घेतलेल्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांना आज तीन ते पाच लाखांच्या हमीच्या बाँडवर जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्त केले.

वास्को पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतलेला रियाझ काद्री हा रियल इस्टेट व्यवसायात असून त्याचे इतरही व्यवसाय आहेत. वास्को येथे त्याला ‘बिग शॉट व्यावसायिक’ म्हणून ओळखले जाते. मागच्या पालिका निवडणुकीत त्याने आपल्या पत्नीला उतरविले होते.

त्यावेळी त्याने तिच्या प्रचारासाठी अनेक डुप्लिकेट कलाकारांना आणून वास्को येथे धमाल उडविली होती. आणखी एक नियाझी शेख हाही मोठा व्यावसायिक असून वास्को येथे फर्निचरच्या व्यवसायात सक्रिय आहे. अमिनुल्ला मुलाल हाही आईस्क्रिमच्या व्यवसायात आहे. महमद साजीद शेख याच्या वास्कोत बसेस सुरू आहेत.

बुधवारी वास्को पोलिसांनी मुरगावचे माजी नगराध्यक्ष सैफुल्ला खान यांनाही ताब्यात घेतले होते. स्थानबद्ध केलेल्यांमध्ये सैफुल्लांचे आणखी दोन साथीदारही होते. मात्र, या तिघांनी आमचा ‘पीएफआय’शी अजिबात संबंध नाही, असे जाहीर केले.

मडगावात अटक केलेल्यांमध्ये बडे व्यावसायिक असून झिया रिकेशी हा इलेक्ट्रिक कंत्राटदार म्हणून काम करतो. नॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन या संस्थेशी निगडित असलेला रियाझ अंजुम हाही मोठा व्यावसायिक म्हणून परिचित आहे. रुमडामळ-दवर्ली येथील पंच उम्रान पठाण यालाही बुधवारी अटक केली होती.

फोंडा येथून काल ज्या आठजणांना ताब्यात घेतले होते, त्यातील मुल्ला महमद सईद आणि मुल्ला अब्दुल मुनाफ हे दोघे प्रस्थापित कंत्राटदार असून अन्य चारजण व्यावसायिक असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

लाखो रुपयांच्या बाँडवर मुक्तता

बुधवारी ज्यांना प्रतिबंधात्मक अटक केली होती, त्यातील अनेकांना लाखो रुपयांचा बाँड आणि हमीवर मुक्त करण्यात आले. फोंडा येथे अटक केलेल्या आठजणांना मुक्त करण्यासाठी प्रत्येकी पाच लाखांची हमी द्यावी लागली. तसेच मायणा-कुडतरी आणि फातोर्डा पोलिसांनी अटक केलेल्यांना प्रत्येकी तीन तर मडगाव पोलिसांनी अटक केलेल्यांना प्रत्येकी दोन लाखांच्या हमीवर सोडण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोविड काळात ‘ते’ दोघेही प्रकाशझोतात

या संघटनेचा गोवा अध्यक्ष शेख अब्दुल रौफ याला कुंकळ्ळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो आणि त्याचा सहकारी शेख जबीर हा मासळी व्यवसायात आहे. कोविड महामारीवेळी या दोघांनीही कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात पुढाकार घेतल्याने ते त्यावेळी चर्चेत आले होते.

यांना मिळाला जामीन

अब्दुल रौफ - गोवा शाखा अध्यक्ष

रईस अंजुम - खजिनदार

इम्रान काची - सरचिटणीस

मुझफ्फर शेख - कार्यकारिणी सदस्य

झिया रिकार्टी - कार्यकारिणी सदस्य

महंमद शेख - कार्यकारिणी सदस्य

जबीर शेख - पीएफआय सदस्य

मौला शिंदोगी - पीएफआय सदस्य

उम्रान पठाण - समर्थक

यासीन कादर - समर्थक

अबूबकर शेख - समर्थक

अलीबेग जमादार - समर्थक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT