Goa Petrol Pump Rush 2026 Dainik Gomantak
गोवा

अफवांचे पीक, पेट्रोलपंपांवर रिघ! "राज्‍यात इंधनाचा पुरेसा साठा, लोकांनी घाबरू नये" मुख्‍यमंत्र्यांची माहिती

Goa Petrol Pump Rush 2026: गॅस सिलिंडरप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार, या अफवेमुळे निर्माण झालेल्‍या धास्‍तीतून बुधवारी राज्याच्‍या विविध भागांतील नागरिकांनी पेट्रोलपंपांवर मोठी गर्दी केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गॅस सिलिंडरप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार, या अफवेमुळे निर्माण झालेल्‍या धास्‍तीतून बुधवारी राज्याच्‍या विविध भागांतील नागरिकांनी पेट्रोलपंपांवर मोठी गर्दी केली. मात्र, राज्यात पुढील पंधरा दिवस पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे, असे आवाहन गोवा पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावरही होत असून, विविध देशांकडून भारताला होणारा गॅस सिलिंडर व इंधन पुरवठा काही प्रमाणात घटला आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने याआधीच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर निर्बंध घातले आहेत. राज्य सरकारनेही त्याची अंमलबजावणी केली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे येत्या काही दिवसांत गोव्‍यात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा

निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे काल मंगळवारी सायंकाळपासून राजधानी पणजीसह विविध भागांतील पेट्रोलपंपांवर नागरिकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी तणावपूर्ण परिस्थितीही निर्माण झाल्याचे दिसून आले.

६ एप्रिलला येणार आणखी एक बोट पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणारी नवी बोट येत्‍या ६ एप्रिल रोजी राज्‍यात दाखल होणार आहे. त्‍यामुळे इंधनाचा तुटवडा जाणवण्‍याचा प्रश्‍‍नच उद्‍भवत नाही. पेट्रोल पंपांवर जाणाऱ्या वाहनांना आवश्‍‍यक तितके डिझेल तेथे देण्‍यात येत आहे.

केवळ व्‍यावसायिक वापरासाठी जे ग्राहक मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करतात, त्‍यांच्‍यावर बंधने लादण्‍यात आलेली आहेत, असे गोवा पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्‍यक्ष नरहर ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर इंधन पुरवठा अधिक सुरळीत होईल, असा दावाही त्‍यांनी केला.

‘कदंब’च्‍या प्रवाशांनाही फटका : पेट्रोल आणि डिझेलच्‍या तुटवड्याचा फटका कदंब महामंडळाच्‍या बससेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनाही बसला. कदंब महामंडळाच्‍या पेट्रोलपंपांवर डिझेलची विक्री ११० रुपये लिटर दराने होत आहे. तर, खासगी पेट्रोलपंपांवर डिझेल ८८ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्‍यामुळे कदंबच्‍या बसेस खासगी पंपांवर जात असल्‍याने आणि तेथे त्‍यांना वेळ लागत असल्‍याने बसेसना विलंब होत आहे.

दिवसा आणि रात्रीही पेट्रोलपंपांवर रांगा : पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्‍या भीतीमुळे नागरिकांनी बुधवारी दिवसभर पेट्रोलपंपांवर रांग लावली. त्‍यामुळे राजधानी पणजीतील अनेक पेट्रोलपंपांवरील पेट्रोल आणि डिझेल लवकर संपल्‍याने ते पंप बंद करण्‍यात आले. रात्री उशिरापर्यंत जे पंप सुरू असतात, तेथेही उशिरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्‍याचे दिसून आले. दरम्‍यान, इंधन संपल्‍याने बंद करण्‍यात आलेल्‍या काही पेट्रोलपंपांनी अतिरिक्त कोटा मागविला. त्‍यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला.

राज्यात पुढील दहा दिवस पुरेल इतका पेट्रोल व डिझेल साठा उपलब्ध आहे. त्‍यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. तसेच इंधनाचा साठा करू नये. तसेच कोणत्‍याही अफवांवर विश्‍‍वास ठेवू नये. - नरहर ठाकूर

अध्‍यक्ष (पेट्रोल डिलर असोसिएशन, गोवा)

‘पंपांवर गर्दी नको’ : देशामध्ये इंधनाचे पुरेसे साठे आहेत. त्यामुळे लोकांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून आज करण्यात आले आहे. समाज माध्यमांत याबाबत व्हायरल होत असलेल्या अफवांवर कुणीही विश्‍वास ठेवू नये, असे सरकारकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT