Construction Dainik Gomantak
गोवा

Pernem: पेडण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गवंडी कामाला ‘सहकार्य’ करण्याची गरज, कारागिरांची मागणी; परप्रांतीयांचा प्रवेशामुळे व्यवसाय धोक्यात

Pernem Construction Workers: : कला आणि व्यवसायाची सांगड घालून केलेला व्यवसाय म्हणजे गवंडी काम. गवंडी काम हे पेडणे तालुक्याचे खास वैशिष्ट्य.

Sameer Panditrao

पेडणे: कला आणि व्यवसायाची सांगड घालून केलेला व्यवसाय म्हणजे गवंडी काम. गवंडी काम हे पेडणे तालुक्याचे खास वैशिष्ट्य. एका बाजूने सध्या रोजगाराची समस्या सतावत आहे. या पार्श्वभूमीवर गवंडी कारागिरीला योग्य दिशा, मार्गदर्शन व सरकारची साथ मिळाल्यास या व्यवसायाला सुवर्णकाळ येणे शक्य आहे. त्यातून गवंडी कला बहरेल व गवंडी कारागिरांना प्रोत्साहन व रोजगार मिळेल, अशी अपेक्षा पेडणेतील गवंडी कारागिरांनी व्यक्त केली.

पेडणे ते काणकोण आणि वाळपई ते मुरगावपर्यंत कुठेही नजर मारल्यास बहुतांश घरे, बंगले, इमारती, मंदिरे, चर्च, मंदिरांचे प्रवेशद्वार, दीपस्तंभ हे पेडणे तालुक्यातील गवंडी कारागिरांनी बांधलेले आहेत. इतकेच नव्हे तर गोवा राज्याच्या हद्दी ओलांडून पेडणे तालुक्यातील गवंडी कारागिरांनी सिंधुदुर्गात कणकवली ते रत्नागिरी, राजापूर आदी गावांबरोबरच दुसऱ्या बाजूने कारवार, कुमठा, बेळगावपर्यंतही बांधकामे केलेली आहेत. पेडणे तालुक्यात ही गवंडी कारागिरी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशी सुरू राहिली.

पोर्तुगीज काळात पेडणे तालुक्याबरोबरच वेगवेगळ्या गावात काही ख्रिस्ती बांधवांच्या मागणीप्रमाणे पोर्तुगीज धाटणीची घरे, या घरांच्या बाहेर व्हरांडा, हिंदू समाजाच्या धाटणीप्रमाणे घरे, बंगले बांधलेले दिसतात. त्याचबरोबर पेडणे तालुक्यातील गवंडी कारागिरांनी सुंदर अशी मंदिरे, मंदिरांचे प्रवेशद्वार, दीपस्तंभ, तुळशीवृंदावन बांधतानाच चर्च, कपेल आदी बांधणी केलेल्या कलाकृती राज्यात कुठे ना कुठे पाहावयास मिळतात.

युवा पिढीकडून काणाडोळा

इतकी वर्षे गवंडी कारागीर व बांधकाम कंत्राटदार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कुटुंबातील युवा पिढी चांगले शिक्षण वगैरे घेऊन सुशिक्षित झाल्याने त्यांना गवंडी काम करणे कमीपणाचे वाटत असल्याने त्यांनी कुटुंबातील पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरी किंवा अन्य उद्योगधंदे करण्यास प्रारंभ केला. अशाप्रकारे संपूर्ण राज्यात बांधकाम व्यवसायावर पकड असलेला हा व्यवसाय पेडणेकरांच्या हातून निसटत गेला. तरीही आज अनेक गवंडी कारागीर या बांधकाम क्षेत्रात आपले पाय रोवून आहेत.

परप्रांतीयांचा व्यवसायात ‘प्रवेश’

कालांतराने कर्नाटक, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील परप्रांतीय गोव्यात आले. त्यांच्याकडे बांधकामाला लागणारी आवश्यक यंत्रसामग्री, कामगार होते. त्यांच्याकडे स्थानिक गवंडी कारागिरांसारखे कौशल्य नव्हते, तरी हे असे परप्रांतीय कमी किमतीत व जलद रीतीने बांधकाम पूर्ण करीत असत. दर्जेदार कामापेक्षा कमी किंमत व लवकर बांधकाम यामुळे अशी बांधकामे परप्रांतीयांना मिळू लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT