Goa | Pernem  Dainik Gomantak
गोवा

Goa: पेडणे येथील 'पुनव' उत्‍सवाला भाविकांची अलोट गर्दी

Goa: श्री देव रवळनाथ व श्री देव भूतनाथ यांच्या तरंगांचे दर्शन घेऊन कौल घेतला.

दैनिक गोमन्तक

Goa: पेडणे येथील प्रसिद्ध पुनवेच्या उत्सवाला काल लाखो भाविकांनी आदिस्थान (देवाचा मांगर) येथे श्री देव रवळनाथ व श्री देव भूतनाथ यांच्या तरंगांचे दर्शन घेऊन कौल घेतला. श्री भगवतीच्या मंदिरात सुवासिनींनी ओट्या भरल्या. या तिन्ही मंदिरांत दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

पेडणे येथील दसरोत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे. या उत्सवाची सुरूवात विजयादशमीला घटस्थापनेने झाली. पुनवेपर्यंत रोज रात्री श्री देवी भगवतीची पालखी, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम मंदिरात होतात. यादरम्यान श्री रवळनाथ व त्याचा मित्र श्री भूतनाथ या देवांची तरंगे हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री भगवती मंदिराकडे येतात.

पुनव हा उत्सवाचा अंतिम भाग. गोव्यासह या देवाचे भाविक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात असून या उत्सवाला ते आवर्जून येतात. यंदा उत्सवावर पावसाचे सावट जाणवत होते. त्‍यामुळे फेरीतील मिठाई, खेळणी, फर्निचर, भांडी व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण नंतर वातावरण निवळल्याने सगळ्यांचाच आनंद द्विगुणित झाला.

किनारी भागात आलेल्या पर्यटकांनीही या उत्सवाला उपस्थिती लावली होती. परिसरात सर्व मंदिरे, सरकारी कार्यालयांच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने हा परिसर झगमगून गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: ..यावेळी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट! व्यावसायिकांचा दावा; खंडित विमानसेवा, आगप्रकरण कारणीभूत असल्याचे प्रतिपादन

Goa Tourism: ‘कम टू गोवा’ एवढ्याने दर्जेदार पर्यटक गोव्यात येणार नाहीत! Social Media वरील बदनामी थांबवण्याची गरज

FDA: फक्त दंडच नाही, दुकानेही बंद! 2026 साठी ‘एफडीए’ सज्ज; अन्नपदार्थांची होणार कसून तपासणी

Canacona School Bus Fire: काणकोणात स्कूलबसला भीषण आग! बस संपूर्णपणे भस्मभात; सुदैवाने जीवितहानी टळली

Goa Politics: खरी कुजबुज; काय? काणकोणकरांना तिसरा जिल्हा नकोय?

SCROLL FOR NEXT