Goa Traffic Rules Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Rules: कर्णकर्कश आवाजात विनाहेल्‍मेट 'सुसाट रायडिंग' करणाऱ्या भावांना पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा; पेडणेत कारवाई!

Pernem Police: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी पेडणे वाहतूक पोलिसांनी पेडणे पालिका क्षेत्रातील दोघा भावांना ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: बेदरकारपणे मोटरसायकल चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, दुचाकी चालवण्याचा परवाना नसणे, मोटरसायकलला दुसऱ्या दुचाकीचे बेकायदेशीर दुसरे पार्ट लावणे यासह अनेक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी पेडणे वाहतूक पोलिसांनी पेडणे पालिका क्षेत्रातील दोघा भावांना ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दोन भावापैकी एक सज्ञान तर दुसरा अल्पवयीन आहे. पोलिसांनी दोघांच्‍याही मोटारसायकल ताब्यात घेतल्‍या आहेत.

बेदरकारपणे मोटरसायकल चालवून स्‍टंट करत असल्‍याचा व्हिडिओ बनवून हे दोघे भाऊ सोशल मीडियावर टाकत असत. ही बाब पेडणे वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शोध घेऊन कारवाई केली. मोठा भाऊ जीए-०८-क्यू-६०७५ या क्रमांकाची मोटरसायकल विनाहेल्‍मेट सुसाट वेगाने चालवत असल्‍याचे व्‍हिडिओत दिसत आहे.

तसेच त्याने आपल्या दुचाकीलाग असलेला मूळ कंपनीचा सायलन्सर काढून त्याऐवजी कर्णकर्कश आवाज करणारा सायलन्सर बेकायदेशीर लावला होता. त्‍याबद्दल त्‍याला ११ हजार रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला.

तर, दुसरा अल्पवयीन मुलगा हा जीए ०२-एफ ५३८३ या क्रमांकाची मोटरसायकल सुसाट वेगाने हेल्‍मेटविना हाकताना दिसतोय. पोलिसांनी त्‍याला १० हजार रुपयांचा दंड तर अल्पवयीन मुलाला मोटारसायकल चालविण्यास दिल्याबद्दल वाहनमालकास २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तीन वर्षांचा होऊ शकतो तुरुंगवास

हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर अल्पवयीन मुलास वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी न्यायालय वाहनमालकास दोषी ठरवून आणखी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावून तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावू शकते. तसेच वाहनाचा परवाना एका वर्षासाठी रद्द व अल्पवयीन मुलगा २५ वर्षांचा होईपर्यंत त्याला वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नसल्याची कायद्यात तरतूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT