Goa Traffic Rules: वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा; गोवा कॅनकडून मागणी

Goa Traffic Rules: वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गोवा कॅनने केली आहे.
Goa Can demanded immediate action against the violators of traffic rules
Goa Can demanded immediate action against the violators of traffic rulesDainik Gomantak

Goa Traffic Rules: वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गोवा कॅनने केली आहे. गोवा वीज खातेच वाहतूक नियम पाळत नसल्याचे गोवा कॅनने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

शिर्ली येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरून वीज खाते लांबलचक व मोठे वीज खांब नेताना आढळले. वाहतूक खात्याने त्यासंदर्भात जीए-०८-व्ही-८०९५ या ट्रकच्या चालकाला दंड ठोठावला आहे. जिल्हा प्रशासनाने वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करावी व त्यासाठी एक कृतियोजना तयार करावी, अशी मागणी गोवा कॅनने केली आहे.

Goa Can demanded immediate action against the violators of traffic rules
Goa Traffic Rules: वाहतूक नियमोल्लंघनाबाबत कारवाई

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांच्या उपअधीक्षकांना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com