Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans: जमिनी हडपण्याचे सरकारचे 'नवे' षडयंत्र; केळशी, बोगमाळोनंतर 'हा' प्रकल्प आता पेडणेकरांच्या माथी- मनोज परब

मनोज परब यांचा आरोप ः रिव्हॉल्युशनरी गोवन्स सरकारचा प्रयत्न हाणून पाडणार

गोमन्तक डिजिटल टीम

Revolutionary Goans मोपा विमानतळासंदर्भात सुरवातीपासून आजपर्यंत पेडणेकरांच्या जमिनी राज्य सरकारने फक्त लोकांना स्वप्न दाखवून बिल्डर लॉबीच्या घशात घातल्या आहेत. सध्या सरकारने मोपा विमानतळ परिसरात ‘थीम पार्क’चा घाट घातला आहे.

हा ‘थीम पार्क’ प्रकल्प म्हणजे निव्वळ जमीन घोटाळा असून लोकांच्या जमिनी हडपण्याचे हे एक षडयंत्र आहे, असा आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी केला.

पेडणे येथे आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे पेडणे मतदारसंघ अध्यक्ष शिवा तांबोस्कर, प्रदीप नाईक व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. मोपा विमानतळाच्या नावाने जशी ८४ लाख चौरस मीटर जमीन हडप केली व तेथे फिल्म सिटी, डिस्को क्लब, कॅसिनो घालण्याचा प्रयत्न सुरू झाला.

त्याचप्रकारे ‘थीम पार्क’च्या नावाने जमिनी हडपण्याचा हा एक प्रकार आहे. त्यासाठी सर्व्हे क्र. ३१० व ३११ मध्ये थीम पार्क साकारण्याची जोरदार तयारी सुरू असून त्याविरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स दंड थोपटेल, असा इशारा प्रमुख मनोज परब यांनी दिला.

परब पुढे म्हणाले, की याआधी हा प्रकल्प मुरगाव तालुक्यातील केळशी, बोगमाळो येथे होणार होता, परंतु तेथील ग्रामस्थांनी हा प्रकल्प हाकलून लावला होता. आता हा ‘थीम पार्क’ पेडणेकरांच्या माथ्यावर थोपला गेला आहे.

जवळजवळ ९७ हजार चौरस मीटर जागा ही डेल्टीनचे मालक जयदेव मोदी यांच्या कंपनीच्या नावावर असून त्यांनी ती जागा परत ब्रम्हाकोर कंपनीला डिसेंबर २०२२ मध्ये विकली, परंतु राज्य सरकारने संबंधित पंचायतीशी चर्चा न करता, जनतेला विश्वासात न घेता शेतजमिनीत हा प्रकल्प उभारण्यास बंधन असूनसुद्धा मान्यता देण्यात आली. जवळच पेडणेतील कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प असून तोसुद्धा दुसरीकडे हलवून ‘थीम पार्क’ उभारण्याची तयारी सुरू आहे.

‘पेडणेकरांना रस्त्यावर आणण्याचे षडयंत्र’

पेडणेकरांच्या जमिनी हडपण्याचे प्रकार बिल्डर लॉबीकडून सतत होत आले आहेत. माविन गुदिन्हो स्वतः आयपीबीमध्ये असून त्यांचा भाऊ रिअल इस्टेटमध्ये गुंतलेला आहे.

त्याचबरोबर पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदार जीत आरोलकर व प्रवीण आर्लेकर हे आज पेडणेकरांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालून पेडण्यातील जनतेला रस्त्यावर आणण्याचे षडयंत्र रचत आहेत, असाही आरोप मनोज परब म्हणाले.

‘रोजगार देण्यात सरकारला अपयश’

आरजी पक्षाचे पेडणे मतदारसंघातील अध्यक्ष शिवा तांबोस्कर व प्रदीप नाईक यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, आजपर्यंत मोपा व इतर प्रकल्प आणूनसुद्धा पेडणेकरांना रोजगार मिळाला नसून हे फक्त आमच्या जमिनी हडपण्याचे षडयंत्र आहे.

अनेक प्रकल्प आणूनसुद्धा सरकार पेडणेकरांना रोजगार देऊ शकले नाही, त्यामुळे ‘थीम पार्क’ प्रकल्प पेडणेकरही धुडकावून लावतील, असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT