अवघी विठाई माझी Dainik Gomantak
गोवा

‘अवघी विठाई माझी’ने रसिक मंत्रमुग्ध

धारगळमध्ये प्रयोग : अभिनयासह सुमधूर गायनाने प्रेक्षकांची मने जिंकली

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे : श्रीराम देवस्थान, महाखाजन-धारगळ येथे मोरजी येथील श्री दाडोबा क्रिएशन संस्थेतर्फे गोमंतकीय नाट्यलेखक नरेंद्र नाईक लिखित संगीत ‘अवघी विठाई माझी’ या नाटकाचा चौथा प्रयोग झाला. यावेळी कलाकारांनी दर्जेदार भूमिका सादर करून रसिक-प्रेक्षकांची मने जिंकली.

उदयोन्मुख गायक समीर शेट्ये (कोरगाव) आणि सूरज शेटगावकर (मोरजी) यांनी अभिनय कौशल्याबरोबरच सुमधूर गायनाने नाट्यरसिकांना मंत्रमुग्ध केले. इतर कलाकारांचीही त्यांना चांगली साथ लाभली. त्यामुळे एकूणच प्रयोगाने वेगळी उंची गाठली. संगीतकार नाना आसोलकर यांनी विशेष कौशल्याने नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले.

त्यांना तबल्यावर संकेत खलप यांनी साथसंगत केली. तर पखवाज साथ चंदन शेटगावकर यांची लाभली. विनय महाले यांनी मंजिरी साथ केली. नाटकाचे दिग्दर्शन हरिश शेटगावकर यांनी केले.

परेश नाईक यांचे पार्श्वसंगीत, तर प्रकाश योजना व नेपथ्य प्रवीण म्हामल यांचे होते. रंगभूषा भास्कर म्हामल यांची होती. नाट्यनिर्मिती अमित शेटगावकर यांची होती. धारगळचे सरपंच अनिकेत साळगावकर यांनी हा नाट्यप्रयोग पुरस्कृत केला होता. नाटकाचा पाचवा प्रयोग पेठेचावाडा-कोरगाव येथील श्रीदेव रघुगोनशेठ देवस्थानात सोमवारी होणार आहे.

या कलाकारांनी साकारल्या भूमिका

नाटकात समीर शेट्ये, हरिश शेटगावकर, व्ही. जी. शेटगावकर, सूरज शेटगावकर, साहील शेटगावकर, कृष्णा सावंत, प्रसाद परब, निवेदिता पुणेकर, आध्या शेटगावकर, सार्थक शेटगावकर, यतीश म्हादलेकर, वामन शेटगावकर, प्रसाद शेटगावकर, समीर शेटगावकर विठू सावंत, अजित शेटगावकर, विशाल शेटगावकर, दत्तप्रसाद फडते, नयनी शेटगावकर, दीपा शेटगावकर, वैशाली शेटगावकर, पल्लवी शेटगावकर, प्राची फडते, सुरेखा शेटगावकर, सुप्रिया शेट्ये यांनी भूमिका साकारल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

COD Fraud: ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ करताय? लागू शकतो चुना; मुरगावात भामट्यांची टोळी सक्रिय, 12 जणांची फसवणूक

Verca: 'शाळा का चुकवली'? पालक ओरडल्याने 2 विद्यार्थी गोव्यातून पळाले; पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले भुसावळमध्ये

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

SCROLL FOR NEXT