Bicholim Art : समृद्ध कलेचा वारसा पुढे न्यावा - विजयकुमार

डिचोली सम्राट क्लबतर्फे पिळगावात चैत्र कलोत्सव उत्साहात
Chaitra Kalotsav in Pilgaon by Bicholim Samrat Club
Chaitra Kalotsav in Pilgaon by Bicholim Samrat ClubDainik Gomantak

डिचोली : कलेच्या माध्यमातून संस्कृती जतन आणि संवर्धनाचे कार्य होत असते. तेव्हा कलाकारांनी कलेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि आपल्या समृद्ध कलेचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नाट्यकर्मी विजयकुमार नाईक यांनी वरगाव येथे बोलताना केले.

चैत्रपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवारी (ता. 6) रात्री डिचोली सम्राट क्लबतर्फे वरगाव-पिळगाव येथे आयोजित ''चैत्र कलोत्सव'' कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विजयकुमार नाईक बोलत होते.

श्री चामुंडेश्वरीच्या प्रांगणातील तलावाच्या काठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. दिनानाथ मंगेशकर, पं. जितेंद्र अभिषेकी, मा. दत्ताराम यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी गोव्याचे कलांगण समृद्ध केले. त्यांच्यानंतर त्यांच्या तोडीचा कलाकार कलेची खाण असलेल्या आपल्या गोव्यात आज दिसत नाही, अशी खंत विजयकुमार नाईक यांनी व्यक्त करून,सम्राट क्लबसारख्या संस्था त्यासाठी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देत असल्याबद्दल अभिनंदन केले.

Chaitra Kalotsav in Pilgaon by Bicholim Samrat Club
Goa Budget For Art and Culture Department: कला समृद्ध गोव्याच्या कला आणि संस्कृती खात्यात सरकारच्या नवीन घोषणा

संदीप निगळे यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. डिचोली सम्राट क्लबचे अध्यक्ष नीलेश टोपले, कार्यक्रम संयोजक प्रसाद नाईक, शेखर नाईक, डॉ.प्रवीण सावंत आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. सिद्धराज शेट्ये यांनी प्रारंभी गणेश वंदना सादर केली. नीलेश टोपले यांनी स्वागत केले. यदुनाथ शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद नाईक यांनी आभार मानले.

Chaitra Kalotsav in Pilgaon by Bicholim Samrat Club
Goa Art: कलाकारांसाठी आनंदाची बातमी! यापुढे ‘कोमल कोठारी’ पुरस्‍कार विभागून दिला जाणार नाही

चैत्र कलोत्सव रंगला

गोव्यातील कलाकारांनी आपल्या कलाविष्कारांचे दर्शन घडवत खऱ्या अर्थाने हा उत्सव समृद्ध केला. यात नाट्य, कविता सादरीकरण, चित्रकला सादरीकरण, मिमिक्री, हार्मोनियम सोलो वादन, नृत्य, बासरी वादन, जादूचे प्रयोग आदी कलांतून कलाकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विजयकुमार नाईक व संदीप निगळ्ये यांनी तलावामध्ये दीप सोडून या उत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com