Goa Road Dainik Gomantak
गोवा

Goa Road: पाटोतील लाकडी मार्ग नादुरुस्त, फलकही झाले खराब!

Goa Road: कचऱ्यामुळे पदपथाचे सौंदर्य एकप्रकारे लुप्त होत असून गलिच्छता वाढलेली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Road: राजधानी पणजीतील कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालयाच्या बाजूच्या खारफुटीत सरकारद्वारे एक उत्तम पदपथ उभारला आहे. परंतु सद्यःस्थितीत येथील लाकडी पदपथाची दुरवस्था झाली असून तातडीने दुरुस्तीची गरज आहे. या पदपथाला छिद्रे पडली असून माहिती फलकही खराब झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी या लाकडी पदपथाच्या बाजूलाच ज्ञानसेतू या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र जुन्या लाकडी पुलाकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. ज्या खारफुटीत हा लाकडी पदपथ उभारला आहे. त्या खारफुटीत विविध प्रकारचा कचरा साचला असून त्यात प्रामुख्याने प्लास्टीक, कागद टाकलेले आहेत.

या कचऱ्यामुळे पदपथाचे सौंदर्य एकप्रकारे लुप्त होत असून गलिच्छता वाढलेली आहे. पदपथावर पक्षांची, विविध प्रकारच्या माशांची माहिती देणारे जे लाकडी फलक उभारले आहेत, ते देखील खराब झाले आहेत. राजधानीत कामानिमित्त आलेले नागरिक तसेच पर्यटक विहारासाठी तसेच काही काळ विश्रांतीसाठी या पदपथावर येतात.

त्यामुळे शासनाद्वारे या लाकडी पदपथाची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. योग्यवेळी डागडुजी न केल्यास या पदपथावरून विहार करताना अचानक पाय आत जाऊन इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या लाकडी पदपथाची डागडुजी होणे गरजेचे आहे.

पदपथावरील लाकडे ठिसूळ, काही ठिकाणी छिद्रे

या पदपथाचे लाकूड ठिसूळ झाले असून लाकडे विस्कळीत झाली आहेत. तसेच काही ठिकाणी छिंद्रे पडली आहेत. या पदपथाचे कुडके गेल्याने डागडुजीची गरज आहे. काही ठिकाणी चालताना अचानक पाय आत ओढल्यासारखे होते. कारण काही ठिकाणी पदपथावरील लाकूड खचले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: साळगाव दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Goa Politics: सरकार गोवेकरांचे की दिल्लीकरांचे? आमदार वीरेश यांचा सवाल, 'सडेतोड नायक'मध्ये मांडली भूमिका

WCL 2025: टीम इंडिया 2025च्या WCL मधून बाहेर, पाकिस्तानची थेट 'फायनल'मध्ये एन्ट्री

Ro-Ro Ferry In Goa: गाजावाजा करत सुरू केलेली 'रो-रो फेरीबोट' सेवा 15 दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रवाशांना नाहक मन:स्ताप

Goa School: पाणी पिण्‍यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार चार मिनिटांचा 'ब्रेक', शिक्षण खात्‍याकडून परिपत्रक जारी

SCROLL FOR NEXT