Mann Ki Baat  Dainik Gomantak
गोवा

Mann Ki Baat म्‍हणजे माहितीचा खजिनाच!- डॉ. दिव्या राणे

पर्ये मतदारसंघात आयोजित कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्‍थिती

गोमन्तक डिजिटल टीम

Mann Ki Baat ‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर चांगले मार्गदर्शन करून अनेक गोष्टींची माहिती देत आहेत. चंद्राच्‍या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे.

येणाऱ्या काळात अजून मोठ्या प्रमाणात विज्ञानात क्रांती होणार असून अवकाशात अनेक शोध, मोहिमा राबविल्‍या जाणार आहेत. महिलासुद्धा आज प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहे, असे प्रतिपादन पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.

पर्ये मतदारसंघात आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमात राणे बोलत होत्‍या. महिलाना आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अनेक माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

यंदा देशाच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना पुन्हा एकदा एकता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.

यात ‘घर-घर तिरंगा’ मोहीम असू दे किंवा ‘मेरा देश मेरी मिठी’ या उपक्रमातून देशभरातून माती एका अमृत कलशात जमा करुन ती दिल्लीला नेण्यात आली. या उपक्रमातून देशाची शक्ती, ताकद व एकदा दाखवून दिली आहे, असे राणे म्‍हणाल्‍या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ‘मन की बात’च्या माध्यमातून आमचा गाव, राज्य, राष्ट्र व देश एकत्र येत आहे. आजचा 104 वा कार्यक्रम माहितीचा खजिना देणारा होता. एका महिलेला मेंदूचा आजार असतानाही तिने देशासाठी त्या आजारावर मात करत खेळात नावलौकिक प्राप्‍त केला. ही गोष्‍ट खूपच प्रेरणादायी आहे.

- डॉ. दिव्‍या राणे, पर्येच्‍या आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT