Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: आधी रस्ते खचायचे, आता पाईप लाईन फुटताहेत; पणजीकरांच्या मागचे स्मार्ट सिटीचे शुक्लकाष्ठ काही सुटेना..

Panjim Smart City: खोदकामाला फटका पणजीवासियांसहित स्थानिक दुकानदार आणि पणजीत येणाऱ्या लोकांना बसला आहे.

Ganeshprasad Gogate

Panjim Smart City: मागील काही महिन्यांपासून राजधानी पणजीत स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाअंतर्गत काँक्रीट रस्ते तयार करण्यासाठी खोदकाम सुरु असून या खोदकामाला फटका पणजीवासियांसहित स्थानिक दुकानदार आणि पणजीत येणाऱ्या लोकांना बसला आहे.

हे प्रकार वारंवार दिसून आले आहेत. तसेच खोदकामामुळे रस्ते खचून वाहने अडकणे, ड्रेनेजच्या लाईन फुटणे या सारख्या समस्याही उद्भवल्याचे आपण पहिले आहे.

या स्मार्ट सिटीच्या कामाबाबत जनता आणि विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होण्याची 31 मे ही तारीख सांगितल्याने धूळ, माती प्रदूषणापासून सुटका मिळणार असल्याने पणजीकरांना हायसे वाटले आहे.

सध्या पणजीत सांतिनेज या परिसरात स्मार्ट सिटीचे कामकाज सुरु असून 31 मे ही काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख गाठण्याच्या नादात रात्रंदिवस काम सुरु आहे.

दरम्यान या भागातील खोदाईमुळे जल वाहिन्या फुटण्याच्या घटना घडत असून मागील आठ दिवसांपासून महालक्ष्मी मंदिराकडील रहिवाश्यांना पाणी टंचाई सहन करावी लागली आहे.

सलग आठ दिवस पाणी नसल्याने लोकांची भलतीच गैरसोय झाली. त्यामुळे संतप्त लोकांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालत संबंधित प्रकरणी जाब विचारला.

मात्र अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीचे कारण पुढे करत कामाच्या गडबडीत असे प्रकार घडत असल्याचे सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी 31 मे या डेडलाइनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tivrem Vargao: 2 गटांत रंगली चुरस! तिवरे–वरगावात सत्तासंघर्षाचा विस्फोट; सरपंच–उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर

Horoscope: प्रॉपर्टी होणार नावावर, कामासाठी होणार प्रवास; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

IFFI 2025: 'इफ्फी' परेडमुळे पणजीत अर्धा दिवस सुट्टी! सरकारी कार्यालये आणि स्वायत्त संस्था दुपारनंतर बंद

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप'ने कंबर कसली! 14 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्तरेत 6, दक्षिणेत 8 जण निश्‍चित

Goa Road Closure: सोरो बार जंक्शन 3 दिवस बंद! आसगाव-बादे परिसरात वाहतूक वळवली; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT