Panjim smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: न्यायाधीश करणार 1 एप्रिलला स्मार्ट सिटी प्रकल्पाची पाहणी

Panjim Smart City: जनतेला न्यायालयाचाच आधार : धूळ प्रदूषणाची माहिती सादर करा!

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करून धूळ प्रदूषणाची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच शहरातील धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासही न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले आहे. विशेष म्हणजे, 1 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांची पाहणी करणार आहेत.

करारानुसार या प्रकल्पाची कामे यावर्षी जून अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, नंतर राज्य सरकारने हस्तक्षेप करून सर्व कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे ची मुदत दिली.

पणजीतील काही रहिवासी भागात जिथे स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत, तेथील जनतेची गैरसोय टाळण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने सांगितले. सांतइनेज ते टोंक रस्ता दोन आठवड्यांत

बुधवारी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम आणि धूळ प्रदूषणाचा मुद्दा उच्च न्यायालयात सुनावणीस आला. राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांचा सद्यस्थिती अहवाल सादर केला.

या अहवालानुसार बहुतांश कामे पूर्ण झाली असून काही कामे सुरू आहेत. सांतइनेज ते टोंक एसटीपी प्लांटपर्यंतचा रस्ता दोन आठवड्यांत पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी:-

  • एजन्सीने खोदलेल्या जागांवर दिवसातून दोनदा पाणी शिंपडावे.

  • चिखल आणि  मातीवर   पाणी टाकणे आणि  ते परत खोदलेल्या जागी भरणे.

  • धुळीने माखलेले रस्ते  स्वच्छ  करणे आणि वेळोवेळी त्यावर पाणी शिंपडणे.

  • वाहतूक व्यवस्थापन

  • शहरात पुढील ३ दिवसांत ट्रॅफिक सिग्नल बसविणे.

  • मुख्य रस्ता खोदल्यावर लोकांसाठी पर्यायी रस्त्याची तरतूद करावी.

  • वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक  पोलिस  नियुक्त करणे.

रस्ते सुरक्षा:-

  • खोदलेल्या खड्ड्यांना सर्व बाजूंनी  कुंपण घालणे, जेणेकरून दुर्घटना टाळता येतील.

  • कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी स्वत: बांधकाम एजन्सीने घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: महावतार नरसिंहचा दमदार जलवा! 17 दिवसांत 213 कोटींचा टप्पा; 'छावा'च्या यादीत झाला समावेश

Comunidade Land Bill: '..अन्यथा न्यायालयात जाऊ'! कोमुनिदाद विधेयक बेकायदेशीर असल्याचा दावा; संघटनांचा विरोध

Goa Crime: तलवार-लाठ्यांनी हल्ला, नंतर गाडीवर गोळीबार; गोव्यात भल्या पहाटे तरुणांवर प्राणघातक हल्ला

Goa Live News: मुंगुल येथे झालेल्या टोळी हल्ल्याच्या पार्श्वभूमीव दक्षिण गोवा एसपींनी बोलावली बैठक

Goa NABARD Loan: ‘नाबार्ड’कडून गोव्याने घेतले 1368 कोटींचे कर्ज! लोकसभेत झाला खुलासा; सीतारामन यांनी केली आकडेवारी सादर

SCROLL FOR NEXT