Panjim Ashtami Ferry Dainik Gomantak
गोवा

Panjim Municipality: अष्टमीच्या फेरीने महापालिका मालामाल; महसुलाने गाठला तब्बल 'एवढ्या' लाखांचा टप्पा

Panjim Ashtami Ferry: आयुक्तांची माहिती: 60 लाख अतिरिक्त जमा

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Ashtami Ferry महानगरपालिकेला यंदाच्या अष्टमीच्या फेरीतून गतवर्षीपेक्षा 60 लाखांचा अधिक महसूल मिळाला आहे.

गतवर्षी महानगरपालिकेला 30 लाखांचा महसूल मिळाला होता, यावर्षी 90 लाखांपर्यंत महसुलाने टप्पा गाठल्याची माहिती आयुक्त क्लेन मेदेरा यांनी ‘गोमन्तक'ला दिली.

गतवर्षी अष्टमीच्या फेरीच्या अर्जांचा काळाबाजार झाला होता. नगरसेवक असलेल्या महिलेच्या नवऱ्याने अर्ज घेऊन अव्वाच्या सव्वा दराने अर्ज विक्री केली होती. त्याने अर्ज विक्रीचे दुकान महानगरपालिका परिसरातच घातले होते.

त्यानंतर अर्जासाठी आलेल्या विक्रेत्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात गर्दी केली होती, त्यामुळे गोंधळ उडाला आणि झालेली गर्दी पांगवण्यासाठी महानगरपालिकेला पोलिस बंदोबस्त मागवावा लागला होता.

त्यावेळी सुरवातीला घेतलेले अर्ज बाद ठरवून नव्याने अर्ज विक्री करण्यात आली होती. त्यातून महानगरपालिकेला 30 हजारांचा महसूल मिळाला होता.

यंदा महानगरपालिकेने दुकानभाडे वाढविल्याने महसूल वाढणार हे निश्‍चित होते. परंतु अर्ज विक्रीच्यावेळी बारा दिवसांच्या फेरीचे एकरकमी भाडे भरणे आवश्‍यक होते. एवढी मोठी रक्कम ज्यांना भरणे शक्य आहे, त्यांनी ते भरले.

परंतु ज्यांना ते शक्य नव्हते ते अर्ज भरण्यास फिरकलेच नाहीत. यावर्षी महानगरपालिकेने वाढविलेल्या भाड्यामुळे 90 लाखांचा महसूल मिळाला आहे.

गतवर्षीपेक्षा 60 लाख रुपये अधिक महसूल मिळाला आहे. परंतु अशा कामासाठी महानगरपालिकेची बरीच यंत्रणा व्यक्त होत असते. या प्रक्रियेत आणखी काही सुविधा आणण्याच्या सूचना आता नगरसेवकांकडून आल्या आहेत.

यावर्षी महानगरपालिकेने 400 दुकानांचे नियोजन केले होते. सुरुवातील काही दिवस व्यवसायिकांकडे एकरकमी देण्यासाठी हवी तेवढी रक्कम नव्हती.

त्यामुळे अनेकांनी तडजोड करून आठ ते दहा दिवसांसाठी दुकाने भाड्याने घेतली. त्यासाठी महानगरपालिकेने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

IFFI 2024: ‘विषय हार्ड’; मानवी संबंधांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT