Fire Brigade Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Case: पणजीत बंद गोदामाला आग; स्थानिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Goa Fire Case: गोदाम बंद असल्याने आग बाहेर पसरली नसून आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आलेय.

Ganeshprasad Gogate

Goa Fire Case: पणजी- ताळगाव भाटलेतील टायनी टॉट्स स्कूलपासून जवळच असलेल्या चर्चच्या मागील सोसायटीतील बंद गोदामाला आग लागल्याची घटना घडली.

शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास या बंद गोदामातून धूर येऊ लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

गोदाम बंद असल्याने नेमका प्रकार काय हे समजत नव्हते. मात्र स्थानिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले.

पणजी येथील अग्निशामकच्या जवानांंनी स्थानिकांच्या मदतीने गोदाम उघडून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

सदर गोदाम हे फर्निचर बनवणाऱ्या एका दुकानदाराचे असून यामध्ये फर्निचरसाठी वापरण्यात येणारया वस्तू असल्याची माहिती मिळाली आहे.

या गोदामामध्ये देवाजवळ दिवाबत्ती केली असून कदाचित उंदरामुळे दिव्यातील वात खाली पडून आग लागली असावी असा अंदाज वर्तवला आहे.

गोदाम बंद असल्याने आग बाहेर पसरली नसून आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आलेय. मात्र फर्निचरच्या सामानाचे किती नुकसान झाले हे पंचनामा झाल्यावरच समजू शकेल असे अग्निशमनकडून सांगण्यात आलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT