Mavin Gudhino Dainik Gomantak
गोवा

'गोव्यातील पंचायत निवडणुका 12 जूनला शक्य'

माविन गुदिन्हो: प्रभाग आरक्षणाला विलंब

दैनिक गोमन्तक

सासष्टी: पंचायत निवडणुकांच्या तारखा अधिकृतपणे जाहीर झालेल्या नाहीत. जास्त करून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता पंचायत निवडणुका जास्त करून रविवारी घेतल्या जातात. त्याप्रमाणे त्या 12 जून रोजी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

मडगावातील एका कार्यक्रमानिमित्त आल्यावर पंचायतमंत्री गुदिन्हो यांना यासंदर्भात प्रश्र्न विचारला, तेव्हा त्यांनी सांगितले की, गोव्यातील पंचायत निवडणुका 4 जून रोजी होतील, असा अंदाज होता. परंतु पंचायतीचे प्रभाग निश्र्चित करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

तसेच पंचायत निवडणुकीसाठी कुठले कुठले प्रभाग आरक्षित केले जातील, याचाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे पंचायत निवडणुका एका आठवड्याने पुढे ढकलाव्या लागतील, असे माविन गुदिन्हो त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कारवाईचा बडगा! गोव्यात 10 नाईट क्लब सील, पण शिल्पा शेट्टीच्या 'बास्टियन'ला 'VIP' वागणूक?

वरगाव-पिळगावच्या ऐतिहासिक चामुंडेश्वरीची 2 जानेवारी पासून जत्रा! रंगणार ‘नौकाविहार’; 5 दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Goa Live News: गोव्यात तिसरी जिल्हा पंचायत स्थापन होणार; अध्यक्ष, उपाध्यक्षांची लवकरच निवड

Ponda Accident: भीषण अपघातानंतर मशिनरी पेटवली, कामगारांना मारहाण! दोघांना अटक; 16 जणांविरोधात गुन्‍हा दाखल

Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

SCROLL FOR NEXT