OBC Reservation | Goa Marathi News Dainik Gomantak
गोवा

गोवा पंचायत निवडणूक: ओबीसींना ही मिळणार आरक्षण

''सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणासाठी गोवा सरकार कटिबद्ध''

दैनिक गोमन्तक

गोवा पंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र या निवडणूकीत ओबीसींच्या 19 घटकांना आरक्षण मिळणार नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने पंचायत निवडणूकीसंदर्भात स्पष्ट केले होते. असे असले तरी, आज पंचायत खात्याकडून अधिसूचित करण्यात आले आहे की, इतर मागास वर्गातील 19 घटकांना गोवा पंचायत निवडणुकीत आरक्षण मिळणार आहे. याबाबत पंचायत खात्याकडून नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Goa Panchayat elections 2022; OBCs will get Reservation )

आरक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध - मुख्यमंत्री

जूलैच्या आरंभी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते की, पंचायत निवडणुकांबरोबर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांमधील सर्व 19 उपजातींना आरक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून येत्या पंचायतींच्या निवडणुकांमध्येही ओबीसींना आरक्षण दिले जाणार असल्याचे आश्वासन ही त्यांनी दिले होते.

त्यामूळे गोवा राज्य सरकारने याबाबत पुन्हा एकदा पंचायत खात्याकडून अधिसूचना जारी करत आपला शब्द पाळण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी याबाबत पुन्हा न्यायालयात धाव घेतल्यास हा विषय न्यायप्रविष्ट होऊ शकते.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली होती खंत

मुंबई उच्च न्यायालयाने पंचायत निवडणूकीसंदर्भात दिलेल्या निर्णयाबाबत फेरफार न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संविधानिक तत्वे पाळणारा असल्याने तो योग्यच आहे. मात्र गोवा सरकारच्या नाकर्तेपणामुळे गोव्यातील इतर मागासवर्गीयांना त्यांना न्याय्य होते. ते आरक्षण मिळालेले नाही, याची खंतही आहे. अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT