North Goa Collector Mamu Hage Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election | प्रलोभने, दबावास बळी न पडता मतदान करा : मामू हागे

मतदान करून लोकशाहीच्‍या या उत्‍सवात सहभागी व्‍हावे, असे आवाहन उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी मामू हागे यांनी केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : पंचायत निवडणुकांच्‍या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी कोणत्‍याही प्रलोभनास किंवा दबावास बळी न पडता मतदान करावे. तसेच मतदान करून लोकशाहीच्‍या या उत्‍सवात सहभागी व्‍हावे, असे आवाहन उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी मामू हागे यांनी केले आहे.

उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी मामू हागे यांनी उत्तर गोव्‍यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदान केंद्र आणि आणि तालुक्‍याच्‍या ठिकाणच्‍या मतमोजणी केंद्राच्‍या 200 मीटरमधील सर्व रेस्टॉरंट, बार, चहाची दुकाने, पान शॉप, भोजनालये आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने, ढाबा आदींना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हे आदेश मतदानादिवशी आणि मतमोजणीदिवशी लागू असतील. आदेशाचे उल्लंघन झाल्‍यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

मतदान केंद्र परिसरात मेळावे, गर्दीस बंदी

उत्तर गोव्‍यातील संबंधित तालुक्यांच्या मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या आत 5 पेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मेळाव्यास किंवा गर्दीवर बंदी घालण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या सार्वजनिक सेवकांना, विवाह, अंत्ययात्रा किंवा धार्मिक मिरवणूक/कार्ये यांना हे निर्बंध लागू असणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'द हंड्रेड' स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजाचा नवा ड्रामा! उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शनवर टिम डेव्हिडचा संताप, व्हिडिओ व्हायरल

NEET Paper leak Protest: "हा विद्यार्थ्यांचा विजय अन् भाजप सरकारच्या अंताची सुरुवात!" आलेमाव यांचा हल्लाबोल

Goa colonial history: गोव्याचा समान नागरी कायदा; समानता की उच्चजातीय हितसंबंध जपणारा करार?

खरी कुजबूज: विजय-गिरीशचे सूत जमले

Goa Forward Party Youth: गोवा फॉरवर्ड पक्षात 30 हून अधिक युवकांचा प्रवेश; 'जेन झी'ने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दाखवून दिली-विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT