Nomination Filing in Bicholim for panchayat election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : पंचायत निवडणुकीसाठी डिचोलीत उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

डिचोली तालुक्यातील नार्वे पंचायतीच्या मावळत्या पंच प्रतिष्ठा मिशाळ यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरला असून, तालुक्यातून अर्ज भरणाऱ्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत.

तुकाराम सावंत

डिचोली : पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस आज सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. डिचोली तालुक्यातील नार्वे पंचायतीच्या मावळत्या पंच प्रतिष्ठा मिशाळ यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरला असून, तालुक्यातून अर्ज भरणाऱ्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत. येत्या 10 ऑगस्ट रोजी पंचायत निवडणुका होणार आहेत.

गोवा निवडणूक आयोगाने 186 पंचायतीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून 10 ऑगस्टला मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. 10 तारखेला मतदान व 12 ऑगस्टला मतमोजणी घेण्यात येणार आहे. 18 ते 27 अर्ज स्वीकारले जाणार आहे. पंचायत निवडणुकीसाठी यापूर्वीच वर्गीकृत जाती-जमाती, इतर मागासवर्गीय वर्गाच्या आरक्षणाच्या मुद्याने बराच वेळ हा मुद्दा न्यायलायत प्रलंबित होता. मात्र आता हा मुद्दा निकालात निघाला असून 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतमोजणीने या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान पंचायत निवडणुकीसाठी गोवा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात चार वेगवेगळ्या याचिकांद्वारे आव्हान देण्यात आलं आहे. त्यावरील सुनावणी आज न्यायालयात होणार आहे. त्यामुळे आता न्यायालय या याचिकांवर काय निकाल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT