Elections
Elections  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील पंचायत निवडणुकांची तारीख अद्याप निश्‍चित नाही: गुदिन्हो

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोव्यातील पंचायत निवडणुकांची तारीख अजून निश्र्चित झालेली नसून सध्या पंचायत क्षेत्राच्या मर्यादा निश्र्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून हे काम पूर्ण झाल्यावर तारखा ठरविल्या जातील, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी आयोजित केलेल्या इफ्तार मेजवानीला ते उपस्थित होते, तेव्हा पत्रकारांशी ते बोलत होते. (Goa panchayat election date not yet decided says Gudinho)

पंचायतीचे क्षेत्र निश्र्चित करण्याच्या प्रक्रियेला लोकांचा विरोध असणे स्वाभाविक आहे. राज्य सरकारने किंवा राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) ही प्रक्रिया केली तरी त्याला विरोधच असणार आहे. एकाच बरोबर सर्वांचे समाधान करता येत नाही. यासंबंधीची कागदपत्रे राज्य निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्यात आली आहेत. ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगातर्फे सुरू असल्याने सरकार (Government) त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

दरम्यान, इफ्तार मेजवानीला मंत्री गुदिन्हो व्यतिरिक्त माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर, आमदार दाजी साळकर, आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार उल्हास तुयेकर, रुपेश महात्मे, शर्मद पै रायतुरकर, नगरसेवक सदानंद नाईक, बबिता नाईक, घनश्याम शिरोडकर, महेश आमोणकर आदी उपस्थित होते.

उर्फान मुल्ला यानी सांगितले, की गोव्यातील सर्व समाज एकसंध आहे हे सिद्ध करण्यासाठी ही मेजवानी आयोजित करण्यात आली होती. सध्या गोव्यात समाजांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र, गोव्यातील (Goa) सर्व समाजातील लोक अपप्रचाराला कधीच बळी पडणार नाहीत, असे मुल्ला यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT