goa panchayat election BJP claim on 142 panchayats  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat : काँग्रेसने टाकली नांगी! अनेक विरोधकांचीही हातमिळवणी

सरपंच, उपसरपंच निवड; अनेक विरोधकांचीही हातमिळवणी

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभेत 50 टक्के जागा जिंकलेल्या भाजपाने मगोप आणि अपक्षांच्या मदतीने सरकार बनवल्यानंतर पंचायत निवडणुकीमध्येत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला. आज सोमवारी झालेल्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपने स्वतःचे 130 आणि मित्र पक्षांसह 142 पंचायतींवर समर्थक सरपंच-उपसरपंच बनल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.

एकूणच पंचायत निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना मूठ बांधण्यामध्ये अपयश आले असून त्यांनी या निवडणुकीत नांगीच टाकल्याचे स्पष्ट झाले.

(goa panchayat election BJP claim on 142 panchayats)

राज्यातील 186 पंचायतींच्या 1528 प्रभागांसाठी 12 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीनंतर आज सरपंच-उपसरपंचपदाची निवड झाली. सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत सर्व पंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. बहुतांश निवडणुका बिनविरोध तर काही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेद्वारे सरपंच आणि उपसरपंच निवडण्यात आले. 29 हुन अधिक विधानसभा मतदारसंघात भाजपने जास्तीत जास्त पंचायती आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. अनेक ठिकाणी अपक्ष, सत्ताधारी गटाच्या विरोधातील सरपंचांनी सत्ताधारी भाजपला जवळ केल्याचे चित्र आहे.

राणेंचा दबदबा

सत्तरी तालुक्यावर मंत्री विश्‍वजीत राणे यांची पकड घट्ट झाली असून तालुक्यातील वाळपई आणि पर्ये मतदारसंघातील बहुतांश पंचायती विश्‍वजीत आणि आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या समर्थकांनी जिंकल्यात. आपल्या समर्थकांना सरपंच उपसरपंच करण्यामध्ये राणे कुटुंबीय यशस्वी झाले आहे.

डॅनियल उपसरपंच

काँग्रेस आमदार दिलायला लोबो यांनी आपल्या शिवोली मतदारसंघातील सहापैकी सहा पंचायतींवर आपले समर्थक सरपंच उपसरपंच निवडून आणले आहेत. याशिवाय पर्रा पंचायतीवर आपला मुलगा डॅनियल लोबो याला उपसरपंच करण्यात यश मिळवले आहे.

...पण सिंह गेला

श्रीमंत पंचायत असलेल्या कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा झाले. विधानसभेत मायकल लोबो यांचा विजय झाला. मात्र, लोबोंसाठी आता ‘गड आला पण सिंह गेला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या पर्वरी मतदारसंघात तीनपैकी दोन पंचायतींवर आपले वर्चस्व ठेवले आहे. एका पंचायतीमध्ये अपक्ष सरपंच-उपसरपंच झाले आहेत.

  • थिवी मतदारसंघात आठपैकी सात पंचायतींवर मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सत्ता प्रस्थापित केली. येथे आरजी आणि किरण कांदोळकर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी उभे होते.

  • मये मतदार संघातील बहुतांशी पंचायती भाजपकडे आल्या असून येथे ‘आरजी’ समर्थक म्हणून निवडून आलेल्या दोघांनी भाजपला समर्थन दिले आहे.

  • मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या साखळी मतदारसंघातील बहुतांश पंचायतींवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांनी आपले समर्थक सरपंच, उपसरपंच निवडून आणण्यामध्ये यश मिळवले आहे.

  • सांगे मतदारसंघातील सातही पंचायती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या समर्थकांनी जिंकल्या असून या पंचायतींवर आपले समर्थक सरपंच आणि उपसरपंच बनवण्यात फळदेसाई यांना यश आले आहे.

  • सभापती रमेश तवडकर यांची पत्नी सविता तवडकर पैंगीण पंचायतींच्या सरपंच म्हणून बिनविरोध.

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांमुळे अनेक अपक्ष शिवाय विरोधकही भाजपसोबत येत आहेत. ही महत्त्वाची बाब आहे. सर्वांना सोबत घेऊन पंचायतीमार्फत गावागावाचा विकास करण्यात येईल.

- डॉ.प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

अनेक अपक्ष सरपंच आमच्या संपर्कात आहेत. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणे हे भाजपचे आणि सरकारचे उद्दिष्ट आहे. आम्ही त्याप्रमाणे राज्यातील सर्वच पंचायतींना बळकट करून विकास प्रक्रियेमध्ये सामावून घेवू.

- सदानंद शेट तानावडे , प्रदेशाध्यक्ष, भाजपा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT