Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: पहिल्या दिवशी मुरगाव तालुक्यातमधून एकही अर्ज नाही

राज्यातील 186 पंचायतीसाठी अर्ज भरण्यासाठी आज झाली सुरुवात

दैनिक गोमन्तक

वास्को: पंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली असून, पंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी मुरगाव तालुक्यात पंचायतीमधून एकही अर्ज दाखल झाला नाही. (Goa Panchayat Election 2022 : No application from mormugao taluka on first day )

राज्यातील 186 पंचायतीसाठी 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र आज उमेदवारी अर्ज घेण्यासाठी गर्दी झाली होती. एकूण 84 उमेदवारी अर्ज आज एकूण सात पंचायतीच्या उमेदवारांनी नेले.

यात सातवाळ पंचायत (30), कुठ्ठाळी पंचायत (7 अर्ज), कासावली, आरोशी, कुवेली पंचायत (9 अर्ज), चिखली पंचायत (19 ), केळशी पंचायत (8 अर्ज ), वेलसाव, पाले, ईसोर्सी (6 अर्ज) व चिकोळणा बोगमाळो पंचायतीत (5अर्ज) अशा प्रकारे एकूण 84 अर्ज आज मुरगांव मामलेदार कार्यालयातून नेण्यात आले. आज मात्र या सातही पंचायती पैकी मुरगाव तालुक्यातून एकही अर्ज दाखल झाला नाही.

दरम्यान मुरगाव मामलेदार कार्यालय पंचायत निवडणुकीला सज्ज झाली असून मामलेदार रणजीत साळगावकर निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. तर अव्वलकारकून कुंदन गडेकर सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी एकूण तीन टेबल मांडण्यात आले आहे. यात टेबल क्रमांक 1 वर वेळसांव, कासवली, ईसोर्सी कुवेली, बोगमाळो पंचायतीचे उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.

आलेल्या अर्जांची पडताळणी करण्यासाठी तलाठी रवींद्र परब व एल डी सी नागेश घाडी काम पाहणार आहे. टेबल क्रमांक 2 वर कुठ्ठाळी व केळशी पंचायतीचे अर्ज स्वीकारले जातील. या टेबलावरती सर्कल निरीक्षक विठू खरात, यु डी सी नेहा मयेकर व तलाठी अमरेश नाईक काम पाहणार आहे.

टेबल क्रमांक 3 वर साकवाळ व कुठ्ठाळी पंचायतीचे अर्ज स्वीकारले जातील. टेबल वरती सर्कल निरीक्षक हनुमंत मांद्रेकर, तलाठी जितेंद्र कामात व तलाठी अनुराज गावस काम पाहणार आहे. अर्जाची पडताळणी करून झाल्यानंतर निर्वाचन अधिकारी रणजीत साळगावकर व सहाय्यक निर्वाचन अधिकारी कुंदन गडेकर उमेदवाराकडून अर्ज स्वीकृत करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT