गोवा

Goa Panchayat: आता पंचायत क्षेत्रातही होणार रस्ते सुरक्षा मंडळ

Goa Panchayat: गोवा राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने रस्ता सुरक्षेवर अधिक भर दिला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Panchayat: गोवा राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने रस्ता सुरक्षेवर अधिक भर दिला जात आहे. याचाच भाग म्हणून गोवा रस्ते सुरक्षा संघटनेतर्फे राज्यातील पंचायतींमध्ये रस्ते सुरक्षा मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

राज्यातील सर्व 191 पंचायतींमध्ये येत्या काळात कार्यकर्ते प्रशिक्षित करून त्यांना कार्यरत करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती रस्ते सुरक्षा कार्यकर्ते आणि गोवा रस्ते सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी दिली.

पंचायत क्षेत्रातील रस्ता सुरक्षेबद्दल जास्त बोलले जात नाही. त्यासाठी येथे जागरूकता निर्माण करून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस आणि रस्ता सुरक्षेशी पंचायत क्षेत्रातील कामे ते करणार आहेत. तसेच प्रत्येक पंचायतीतील रस्ता सुरक्षा मंडळ आणि वाहतूक व्यवस्थापन समितीदेखील गठित केली जाईल.

पंचायत क्षेत्रातील रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दिशेने हे काम केले जात आहे, असे नाईक यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना संघटनेकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच पंचायतीतील बैठका, त्या क्षेत्रातील रस्त्यांचे सर्वेक्षण आणि समस्या यांचे अहवाल तयार करून त्यावर तोडगा काढण्याचे काम केले जाईल, असे नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT