Goa panchayat meetings Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat: गोव्यातील पंचायतींसाठी नवी माहिती! महिन्यातून होणार 4 बैठका; खात्‍याकडून मसुदा अधिसूचना जारी

Goa panchayat meetings: सरपंच ठरवतील त्‍या तारखांना किंवा सरपंचांच्‍या गैरहजेरीत उपसरपंच ठरवतील त्‍या तारखांना या चार बैठका घेणे अनिवार्य राहील, असे मसुदा अधिसूचनेत म्‍हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: व्‍यवसाय सुलभतेसाठी राज्यातील पंचायतींनी यापुढे महिन्‍यातून किमान चार बैठका घेणे बंधनकारक करण्याचा विचार सरकारने चालवला आहे. पंचायतराज कायद्यातील नियमांत बदल केल्‍याची मसुदा अधिसूचना पंचायत संचालक महादेव आरोंदेकर यांनी जारी केली आहे. यासंदर्भातील सूचना आणि हरकतींसाठी १५ दिवसांचा कालावधी देण्‍यात आला आहे.

पंचायतराज कायद्याच्‍या नियम ३ अंतर्गत यापूर्वी पंचायतींना प्रत्‍येक महिन्‍याला एकदाच बैठक घेण्‍याची मुभा होती. परंतु, खात्‍याने या नियमात बदल करून पंचायतींनी प्रत्‍येक महिन्‍याला किमान चार बैठका घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. सरपंच ठरवतील त्‍या तारखांना किंवा सरपंचांच्‍या गैरहजेरीत उपसरपंच ठरवतील त्‍या तारखांना या चार बैठका घेणे अनिवार्य राहील, असे मसुदा अधिसूचनेत म्‍हटले आहे.

नियम क्र. ३ अन् ४ मध्ये बदल

खात्‍याने नियम क्रमांक ३ सह क्रमांक ४ मध्‍येही बदल केला आहे. यापूर्वी पंचायत सचिवांना सामान्य बैठकीसाठी निश्चित तारखेच्या किमान सात दिवस आधी आणि विशेष बैठकीच्या किमान तीन दिवस आधी सर्व सदस्यांना बैठकीचे ठिकाण, तारीख, वेळ आणि बैठकीतील कामकाजाची माहिती कळवावी लागत होती. यापुढे सामान्य बैठकीसाठी निश्चित तारखेच्या किमान तीन दिवस आधी आणि विशेष बैठकीच्या किमान दोन दिवस आधी पंचायत सचिवांनी सदस्यांना बैठकीचे ठिकाण, तारीख, वेळ आणि कामकाजाची माहिती पाठवावी लागणार आहे.

नागरिकांची प्रतीक्षा थांबविण्‍यासाठी निर्णय

यापूर्वी पंचायतींची महिन्‍यातून केवळ एकच बैठक व्हायची. त्‍यामुळे विविध परवान्‍यांसाठी स्‍थानिकांना बैठकीची प्रतीक्षा करावी लागत होती. त्‍याचा अनेकांना फटकाही बसत होता. त्‍यामुळेच यापुढे पंचायतींनी महिन्‍यातून किमान चार बैठका घ्‍याव्‍यात असा निर्णय खात्‍याने घेतला आहे, अशी माहिती संचालक आरोंदेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Toyyar Wetland: पोर्तुगीज काळापासून पणजीला पाणी देणारा ‘व्हडाचे मांड’, चिंबलातील ‘तोय्यार’चे महत्त्व

Pooja Naik: 'कॅश फॉर जॉब'चा डोंगर पोखरून उंदीरही हाती लागणार नाही, उलट 'पूजा नाईक'चा बळी दिला जाईल..

Sholay Returns In 4K: ठाकूर करणार गब्बरचा खात्मा, 'शोले'चा न पाहिलेला शेवट पाहायला मिळणार, कधी होणार रिलीज?

'..किनारे वाचवा'! मुंबईच्या विद्यार्थिनीने पार केला गोव्याचा समुद्र; कुठ्ठाळी ते मिरामार पोहून राबवली Swim for Sea मोहीम

Goa Today Live Updates: आयएएस अधिकारी निखिल देसाईंकडून पूजा नाईकला मानहानीची नोटीस

SCROLL FOR NEXT