Curti Khandepar Panchayat: कुर्टी-खांडेपार नूतन पंचायतघराला 'रवीं'चे नाव! ग्रामसभेत ठराव एकमताने संमत

Curti Khandepar Panchayat Ravi Naik: सरपंच नावेद तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. पंचायत सचिवाने मागील ग्रामसभेचा अहवाल मांडल्यावर ग्रामसभेला सुरवात झाली.
Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या नूतन पंचायतघराला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे दिवंगत आमदार तसेच कृषिमंत्री रवी नाईक यांचे नाव द्यावे असा महत्त्वपूर्ण ठराव पंचायतीच्या ग्रामसभेत एकमताने संमत झाला. रविवारी ही ग्रामसभा खांडेपार येथील पंचायत कार्यालयात घेण्यात आली.

सरपंच नावेद तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. पंचायत सचिवाने मागील ग्रामसभेचा अहवाल मांडल्यावर ग्रामसभेला सुरवात झाली.

कुर्टी - खांडेपार पंचायतीला नवीन सुसज्ज असे पंचायतघर उपलब्ध व्हावे यासाठी मंत्री रवी नाईक यांचा आग्रह होता. कुर्टीतील गृहनिर्माण वसाहतीत नवीन पंचायतघरासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे, त्यासाठी गृहनिर्माण महामंडळाकडे आमदार रवी नाईक यांनी पाठपुरावा करून आवश्‍यक कार्यवाही करून घेतली होती.

Ravi Naik
Ravi Naik Tribute : 'रवी नाईक' गोमंतकीयांसाठी होते जननेते! मडगावचो आवाजतर्फे ‘रिमेंबरिंग पात्रांव’ शोकसभा

त्यांच्यामुळे हे नवीन पंचायतघर उभारले जात असून त्यांचेच नाव या पंचायतघराला देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत झाला.या पंचायतघराचे काम लवकरच सुरू करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले असल्याची माहिती सरपंच नावेद तहसीलदार यांनी ग्रामसभेत दिली. त्यानंतर एकमताने नाव देण्याचा ठराव संमत करण्यात आला.

दरम्यान, पंचायत क्षेत्रातील कचरा प्रश्‍न तसेच सीसीटीव्ही कॅमेरासंबंधी सरपंचांनी हे दोन्ही प्रश्‍न सोडवण्यात येईल, असेसांगितले.

Ravi Naik
Ravi Naik: काँग्रेसने 'रवीं'ना खरेच न्याय दिला नाही?

अतिक्रमणविरोधात नोटिसा...!

दीपनगर - कुर्टीतील स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या काही घरांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या स्मशानभूमीच्या जागेत काहीजणांनी अतिक्रमण केल्यामुळे या ठिकाणी वाहन नेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ग्रामसभेत स्पष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com