Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrat: सुनावणीस गैरहजर राहण्याच्या मागणीला सीबीआयचा आक्षेप

पोलिस स्थानक हल्ला : मोन्सेरात दाम्पत्याचा अर्ज

गोमन्तक डिजिटल टीम

Babush Monserrat पणजी पोलिस स्थानक हल्लाप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीस कायमस्वरूपी गैरहजर राहण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी न्यायालयात केलेल्या अर्जाला सीबीआयने आक्षेप घेतला आहे.

संशयितांना अशी परवानगी देऊ नये, असा अर्ज आज शुक्रवारी सीबीआयने न्यायालयात सादर केला आहे.

दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर ही सुनावणी सुरू असून सीबीआयचे वकील नौशाद यांनी हा अर्ज सादर केला. आता या अर्जावर पुढील शुक्रवारी निकाल देण्यात येणार आहे.

आपल्या कार्यकर्त्यांना अटक केली; परंतु दुसऱ्या गटातील संशयितांना का अटक केली नाही, याचा जाब विचारण्यासाठी मोन्सेरात दाम्पत्य कार्यकर्त्यांसह पोलिस स्थानकावर चाल करून आले होते. त्यावेळी बाबूश मोन्सेरात यांनी प्रक्षोभक भाषण केले असता, जमावाने खवळून पोलिस स्थानकावर हल्ला केला आणि मोडतोड केली, असा सीबीआयचा आरोप आहे.

सुनावणी तहकूब

माजी वीजमंत्री माविन गुदिन्हो यांच्या विरोधातील वीज बिल सवलत घोटाळा प्रकरणातील साक्षीदार सुभाष शिरोडकर हे आरोग्याच्या कारणास्तव सुनावणीस गैरहजर राहिल्याने ही सुनावणी 28 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT