Shashi Tharoor |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'उर्वरित भारतही गोव्यासारखा व्हावा'- शशी थरूर

Shashi Tharoor: गोवा ही भारताची आकर्षक कथा

दैनिक गोमन्तक

Shashi Tharoor: वारसा जतन करणे आणि भविष्यातील पिढ्यापर्यंत पोहोचविण्याची कथा सांगणे हा एक अविश्‍वसनीय मार्ग आहे. गोवा ही भारताची आकर्षक कथा आहे. आपणास बाकीचा भारत हा गोव्यासारखा झालेला आवडेल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी शनिवारी वारसा महोत्सवात व्यक्त केले.

कांपाल येथे सुरू असलेल्या या महोत्सवात विवेक मिनेझिस यांनी थरूर यांची मुलाखत घेतली. थरूर म्हणाले, केरळमधील लोकांनी आपली एक वेगळी ओळख जपलेली आहे. केरळमध्ये 53 टक्के हिंदू आहेत.

विशेष बाब म्हणजे येथील मुस्लिम समाजाने सुधीर खानसारखी नावही ठेवलेली आहेत. आपल्या मतदारसंघात ख्रिश्‍चन, मुस्लिम आणि हिंदूही आहेत. मुस्लिम समाजाच्या वस्तीच्या एका बाजूला हिंदू मंदिर आहे, तरीही या भागात पूर्णपणे शांतता असते. आता केरळचा ओनम महोत्सव घ्यावा, हा पूर्णपणे हिंदू समाजाचा महोत्सव.

परंतु तो राज्यात सर्व समाज एकत्रितरित्या साजरा करतात. तेथील लोक आपली ओळख जपण्याचा प्रयत्न करतात, त्यामागे कोणताही धर्म आड येत नाही असे आपणास दिसते. यावेळी त्यांनी ओनम महोत्सवामागील दंतकथाही सांगितली.

परेदशातील भारतीय लोक आणि तेथील समाजजीवन याविषयी आलेल्या अनुभवावर थरूर म्हणाले, 2004 मध्ये आपण आखाती देशात गेलो होतो. चार-पाच ठिकाणी तेथे भेट दिली.

त्यावेळी भारतातील निवडणूक झाली होती आणि त्यावेळी इटालियन असलेल्या सोनिया गांधी यांचे नेतृत्व होते. त्यानंतर मनोहन सिंग पंतप्रधान झाले. 81 टक्के हिंदू असलेल्या देशात ही बाब घडल्यामुळे ते तेथे एक आश्‍चर्य समजले जात होते.

आखातात वारसास्थळांना महत्त्व

आखातात वारसास्थळे किंवा तेथील संस्कृतीचे जतन करण्यासाठी सरकार विविध प्रकारची मदत करीत असते, असे शशी थरूर यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. याप्रसंगी त्यांनी आपल्या पुस्तक निर्मितीविषयीची माहिती विषद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT